शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:23 IST

या कमांडोवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३०४ बी अंतर्गत हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली - एका ब्लॅक कॅट कमांडोला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. या कमांडोने कोर्टात ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असल्याचा युक्तिवाद केला. ऑपरेशन सिंदूर हा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांविरोधात पलटवार होता. कोर्टाने कमांडोच्या या युक्तिवादावर कठोर शब्दात त्यातून इम्युनिटी मिळणार नाही. केवळ कमांडो आहे म्हणून पत्नीच्या हत्येच्या आरोपातून सूट देऊ शकत नाही असं कोर्टाने स्पष्ट केले. त्याशिवाय ज्यारितीने कमांडोने पत्नीची भयानकपणे गळा दाबून हत्या केली त्यामुळे तो माफीच्या लायकीचा नाही असंही कोर्टाने फटकारले. 

'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली वाचायचे होते

सुप्रीम कोर्टाचे न्या. उज्ज्वल भुइया आणि न्या. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. कमांडोने कोर्टात एक स्पेशल लीव पिटिशन दाखल केली होती. त्यात पोलिसांकडे सरेंडर करण्यापासून सूट मागितली होती. कमांडोने म्हटले की, मी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होतो. मी एक ब्लॅक कॅट कमांडो आहे. ब्लॅक कॅट कमांडो, नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडोंना म्हटले जाते. एनएसजी भारतातील खास दहशतवादविरोधी फोर्स आहे असं त्याने म्हटले. त्यावर तुम्हाला त्यामुळे इम्युनिटी मिळणार नाही. तुम्ही शारीरिक किती फिट आहात, तुम्ही एकट्यानेच पत्नीचा गळा दाबला असेल. ज्याप्रकारे तू पत्नीची हत्या केली आहे. ती खूप भयानक आहे. त्यासाठी सरेंडर करण्यापासून सूट देता येत नाही. हायकोर्टानेही कमांडोला सूट देण्यास नकार दिला असं सांगत सुप्रीम कोर्टाने आरोपी कमांडोला दिलास देण्यास नकार दिला. 

हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप

या कमांडोवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३०४ बी अंतर्गत हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप आहे. जर एखाद्या महिलेच्या लग्नानंतर ७ वर्षाच्या आत जळून, शारिरीक छळ किंवा संशयास्पद मृत्यू झाल्यास हुंड्यासाठी हत्या केल्याचे मानले जाते. कमांडोच्या वकिलाने युक्तिवाद केला की, हुंड्यात केवळ एक मोटारसायकल मागितली हा आरोप आहे. हा आरोप मृत पत्नीच्या २ नातेवाईकांनी लावला. परंतु साक्षीदारांच्या विधानास विरोधाभास दिसतो असं म्हटले. परंतु कोर्टाने कमांडोला दिलासा देण्यास नकार दिला. जेव्हा कमांडोच्या वकिलाने सरेंडर करण्यासाठी वेळ मागितली तेव्हा कोर्टाने त्यांना २ आठवड्याचा वेळ दिला.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय