शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:21 IST

रशियात जाऊन पुतिन यांची भेट घेणारे अजित डोवाल आता फ्रान्सला पोहोचले आहेत...

जेव्हा जेव्हा एखादे प्रकरण अडकते अथवा एखादी समस्या निर्माण होते, तेव्हा तेव्हा भारताचे NSA अजित डोवाल त्यातून मार्ग काढण्यासाठी उभे राहतात. रशिया-युक्रेन युद्ध असो अथवा कुठलाही महत्त्वाचा करार असो, पंतप्रधान मोदींचे संकटमोचक अजित डोभाल सर्वत्र दिसतात आणि मोदींच्या विश्वासावरही खरे उतरतात. रशियात जाऊन पुतिन यांची भेट घेणारे अजित डोवाल आता फ्रान्सला पोहोचले आहेत. 

डोवाल यांनी फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष अथवा राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि अनेक महत्त्वाच्या करारांवर चर्चा केली. अजित डोवाल यांनी रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींनी फ्रान्सला दिलेला संदेशही उदृत केला. तसेच, रशिया-युक्रेन युद्ध भारत कशा पद्धतीने संपवू शकतो, यासंदर्भातही डोवाल यांनी मॅक्रॉन यांना संपूर्ण योजना सांगितली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. डोवाल यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना सांगितले की, पीएम मोदींनी दोन्ही देशांना युद्ध संपवून संवादातून शांततेचा मार्ग शोधण्यास सांगितले आहे. अजित डोवाल यांनी मॅक्रॉन यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोन आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू आणि परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांचीही भेट घेतली आणि भारताची मनिषा स्पष्ट केली.

मॅक्रॉन आणि डोवाल यांच्यात काय चर्चा झाली? - अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घेऊनच फ्रान्सला गेल्याचे सांगण्यात येते. डोवाल यांची फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत यशस्वी भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्ध, तसेच गाझातील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायल युद्धावरही चर्चा केली. याशिवाय भारत आणि फ्रान्समधील संबंध अधिक सुधारण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींचा शांततेचा संदेश ऐकल्यानंतर, रशिया-युक्रेन युद्धात केवळ भारतच सकारात्मक भूमिका बजावू शकतो, असे आता फ्रान्सलाही वाटू लागले आहे.  फ्रान्सचा यावर विश्वासही आहे, कारण पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी युक्रेन आणि रशिया या दोघांनाही भेटून युद्ध संपवण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालFranceफ्रान्सRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIsraelइस्रायल