शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवीप्रमाणे NRI महिलेचा मृत्यू, बाथटबमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 11:13 IST

अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या एका 40 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा हरियाणातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे.

सूरजकुंड- अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या एका 40 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा हरियाणातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी यांचा ज्याप्रमाणे बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता त्याचप्रमाणे या महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी रात्री या महिलेचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला. 

अमेरिकेतील न्यूजर्सी येथे राहत असलेल्या भारतीय वंशाच्या रितू कुमार कामानिमित्त भारतात आल्या होत्या. २२ एप्रिलला सूरजकुंडमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी रुम बूक केली. रितू कुमार २६ एप्रिलपासून आपल्या कोणत्याही नातेवाईकांच्या फोनचं उत्तर देत नव्हत्या. फोन रिंग होत असूनही उचलत नसल्याने कुटुंबातील सदस्यांना हरियाणा पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन रितू कुमार यांची चौकशी केली.रितू कुमार रुमच्या बाहेर न पडल्याने तसंच कोणतीही रुम सर्व्हिस न घेतल्याने पोलिसांना संशय आला. रुम उघडून आतमध्ये गेल्यानंतर रितू कुमार यांचा मृतदेह बाथटबमध्ये पडला होता. पोलिसांनी रुम सील केला असून, फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करुन घेतली आहे. 

दरम्यान, तपास पथक घटनास्थळावरून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कुठलही सुसाइड नोट सापडली नाही. तसंच रितू यांनी मद्याचं सेवन केल असल्याचंही आढळून आलेलं नाही. ह्रदय विकाराने रितू यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.