शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये नागरिकता नोंदणीसाठी घेतली 10 हजार रुपयांची लाच; दोघे अधिकारी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 18:56 IST

आसाममध्ये घुसखोर आणि स्थानिक यांची ओळख पटविण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

गुवाहाटी : आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा केंद्र सरकार आणणार असल्याच्या पार्श्वभुमीवर बाहेरून आलेल्या लोकांची पैसे घेऊन नावे रजिस्टरमध्ये टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी लाचलुचपत खात्याने दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. 

गुरुवारी सैयद शाहजाहा आणि राहुल पराशर अशा दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. गुवाहाटीच्या दिसपूर एनआरसी केंद्र क्रमांक 8 च्या कार्यालयामध्ये ताब्यात घेण्यात आले. आसाममध्ये घुसखोर आणि स्थानिक यांची ओळख पटविण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. याला पश्चिम बंगालमधूनही विरोध झाला आहे. 

एसीबीच्या संचालकांनी सांगितले की, सैयद शाहजाहा हे फिल्ड लेव्हल ऑफिसर आणि पाराशर हा लोकल रजिस्टर या पदावर काम करतात. आनंतद नगरचे रहिवासी कजरी घोष दत्त यांनी या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. एनआरसी ड्राफ्टमध्ये त्या महिलेचे नाव नाही असे तिने सांगितले. यामुळे तिने अर्ज दिला होता. यावेळी या दोन अधिकाऱ्यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. 

आरोपींकडे महत्वाचे कागदपत्रही सापडले आहेत. तसेच एनआरसी सेवा केंद्राची तपासणीही केली जात आहे. दोन्ही आरोपींनी महिलेने दिलेल्या अर्जामध्ये काही चुका काढल्या होत्या. या चुका दूर करण्यासाठी त्यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांना न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. 

 

 

एनआरसी 31 जुलै पर्यंत येणारसर्वोच्च न्यायालयाने 8 मे रोजी सुनावणी करताना एनआरसी लागू करण्यासाठीचा वेळ पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली होती. तसेच 31 जुलै पर्यंत विधेयकाचा मसुदा प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते. तसेच ज्यांची नावे या यादीमध्ये नाहीत त्यांची वंशावळ आणि जमिनीवरील नोंदी यावरून नावे नोंद करण्याचे आदेश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि एन एफ नरीमन यांनी दिले होते.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAssamआसाम