शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘एनपीआर’, ‘एनआरसी’ वायफळ उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:53 IST

शंभरहून अधिक निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित केली

नवी दिल्ली : शंभरहून अधिक निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित केली असून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे सरकारतर्फे राबविले जाणारे दोन्ही प्रस्तावित कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला त्रासात टाकणारे ‘अनावश्यक व वायफळ उद्योग’ असल्याचे मत व्यक्त केले आहे.देशातील नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात या निवृत्त अधिकाऱ्यांनी हे मतप्रदर्शन केले असून ‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ची तरतूद असलेली १९५५ च्या नागरिकत्व कायद्यातील संदर्भित कलमे रद्द करण्याचा जनतेने सरकारकडे आग्रह धरावा असे आवाहन केले आहे.हे पत्र लिहिणाºयांमध्ये दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, निवृत्त कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्ला इत्यादींचा समावेश आहे. हे अधिकारी पत्रात लिहितात की, अर्थव्यवस्तेची सध्याची स्थिती पाहता सरकारने त्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असताना सरकार व जनता परस्परांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र देशाला परवडणारे नाही. शिवाय ‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ लागू न करण्याची भूमिका अनेक राज्य सरकारांनी घेतली असताना केंद्र व राज्यांमधील संघर्ष आपल्या संघराज्य व्यवस्थेला पोषक नाही. नव्याने करण्यात आलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पूर्णपणे मागे घेण्याखेरीज नागरिकत्व न्यायाधिकरणे व ‘डिटेन्शन कॅम्प’ स्थापन करण्यासंबंधीचे आदेशही मागे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक