शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

आता तृणमूल काँग्रेसची शिवसेनेला टाळी,सत्ताधा-यांना घेरण्यासाठी रणनीती आखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 03:58 IST

भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी रणनिती आखणा-या तृणमूल काँग्रेसने आता शिवसेनेला टाळी दिली आहे.

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी रणनिती आखणा-या तृणमूल काँग्रेसने आता शिवसेनेला टाळी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात लोकहिताच्या मुद्यांवर सत्ताधारी भाजपविरोधात शिवसेनेला सोबत घेण्याचे संकेत तृणमूलचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिले. संसदेत तृणमूल व शिवसेना एकत्र आल्यास दिल्लीत भाजपविरोधात नवी समीकरणे तयार होतील. तृणमूल अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. हा संदर्भ देत ब्रायन यांनी लोकमतला सांगितले की, आम्ही राजकीय जुळवाजुळव करीत नाही. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी ते भेटले होते. नोटबंदीविरोधात दिल्लीत झालेल्या मोर्च्यात सेना खासदार सहभागी झाले होते. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांवर संसदेतही आम्ही एकत्र येवू.>आम्ही भाजपाच्या दाव्यांची पोलखोल करूअभ्यासू खासदार म्हणून परिचित असलेल्या ब्रायन यांच्या ‘इनसाइड द पार्लिमेंट; व्ह्यूव फ्रॉम द फं्रट रो’ या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन झाले. यात ४६ लेख व भाषणे आहेत. भाजपला २०१९ साली पराभूत कसे करावे- या त्यातील लेखाची सवार्धिक चर्चा आहे. त्यावर ब्रायन म्हणाले, भाजप करीत असलेल्या दाव्यांची आम्ही पोलखोल करू.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभा