शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Dry Day Rule Delhi : आता दिल्लीत वर्षाला 21 एवजी फक्त 3 ड्राय-डे; जाणून घ्या, हॉटेल-दुकानांसाठीचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 12:10 IST

दिल्ली सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हणण्यात आले आहे की, दारू आणि अफूची दुकाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (15 ऑगस्त) आणि गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला बंद राहतील.

दिल्ली सरकारने (Delhi Government) आपल्या उत्पादन शुल्क धोरणात (New Excise Policy) काही बदल केले आहेत. यानुसार आता ड्राय-डे (Dry Day) ची संख्या कमी करण्यात आली आहे. यापूर्वी येथे वर्षभरात 21 दिवस ड्राय-डे होते. मात्र, आता 3 दिवसच ड्राय-डे असणार आहेत. यासंदर्भात नवा नियमही लागू करण्यात आला आहे. 

या दिवशी असतील ड्राय-डे -दिल्ली सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हणण्यात आले आहे की, दारू आणि अफूची दुकाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (15 ऑगस्त) आणि गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला बंद राहतील.

हॉटेल्स आणि दुकानांसाठी असेल असा नियम -दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010 (52)च्या तरतुदींनुसार, 2022 मध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मद्यविक्रीला परवानगी नसेल. उत्पादन शुल्क विभागाने म्हटल्याप्रमाणे, एल-15 परवाना असलेले हॉटेल चालक ड्राय-डेच्या दिवशी अतिथींना आपल्या खोल्यांमध्ये दारू देऊ शकतील. याच बरोबर, या तीन ड्राय-डें व्यतिरिक्त सरकार वर्षातील कोणताही दिवस वेळोवेळी 'ड्राय-डे' म्हणून घोषित करू शकते, असेही आदेशात म्हणण्यात आले आहे.

केव्हा लागू करण्यात आले आबकारी धोरण?दिल्ली सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी दिली. जे 17 नोव्हेंबरपासून लागू झाले आहे. या नव्या उत्पादन शुल्क धोरणामध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत. आता सरकारच्या या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत प्रत्येक प्रभागात तीन ते चार दारूची दुकाने सुरू होत आहेत. यापूर्वी असे 79 वॉर्ड होते, जेथे दारूची दुकानं नव्हती.

आधी केव्हा केव्हा असायचा ड्राय-डे?यापूर्वी होळी, दिवाळी, जन्माष्टमी, मुहर्रम, ईद-उल-जुहा (बकरीद), गुड फ्रायडे, राम नवमी, महावीर जयंती, बुद्ध पैर्णिमा, महर्षि वाल्मीकि जयंती, गुरु नानक जयंती आणि दसऱ्यासह इतर सणांच्या दिवशी ड्राय-डे असायचा.

टॅग्स :delhiदिल्लीhotelहॉटेल