शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता मोठ्या टोल टॅक्सपासून होणार सुटका! नितीन गडकरींची मोठी घोषणा, लिस्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 13:20 IST

आता अनेक लोकांना टोल टॅक्स भरावा लागणारन नाही. यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. नवीन नियमांनुसार टोल टॅक्समध्ये सूट देण्यात येणार आहे. यासंदर्भात संपूर्ण यादीही जारी करण्यात आली आहे.

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्स (Nitin Gadkari On Toll Tax) संदर्भात मोठी माहिती दिली आहे. आपणही मोठ्या टोल टॅक्समुळे त्रस्त असाल तर, ही बातमी खास आपल्यासाठी आहे. कारण आता अनेक लोकांना टोल टॅक्स भरावा लागणारन नाही. यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. नवीन नियमांनुसार टोल टॅक्समध्ये सूट देण्यात येणार आहे. यासंदर्भात संपूर्ण यादीही जारी करण्यात आली आहे.

या लोकांना टॅक्स द्यावा लागणार नाही - टोल टॅक्स NHAI कडून वसूल केला जात आसतो. जर आपण हायवेरून चार चाकी वाहनाने प्रवास करत असाल तर, आपल्याला हा टॅक्स द्यावा लागतो. तसेच आपण दूचाकीने प्रवास करत असाल तर आपल्याकडून टोल टॅक्स घेतला जात नाही. दुचाकी वाहन खरेदी करतानाच ग्राहकांकडून रोड टॅक्स घेतला जातो. सध्या टोल टॅक्स वाहनाच्या लांबीवरून आधारीत आहे.

संपूर्ण लिस्ट अशी - -  भारताचे राष्ट्रपती-  भारताचे पंतप्रधान-  भारताचे मुख्य न्यायाधीश-  भारताचे उपराष्ट्रपती-  राज्याचे राज्यपाल- कॅबिनेट मंत्री-  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश-  लोकसभाध्यक्ष-  राज्य मंत्री-  मुख्यमंत्री- नायब राज्यपाल- सामान्य अथवा समकक्ष रँकचे चीफ ऑफ स्टाफ-  कुठल्याही राज्याचे विधानसभा अध्यक्ष-  उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश-  विधान परिषदेचे अध्यक्ष-  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश- भारत सरकारचे सचिव-  राज्य परिषद-  संसद सदस्य आर्मी कमांडर, व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ- संबंधित राज्यांमध्ये राज्य सरकारचे मुख्य सचीव-  विधानसभा सदस्य-  राज्याच्या दौऱ्यावर असलेले परदेशी मान्यवर

या लोकांनाही द्यावा लागणार नाही टॅक्स - वर देण्यात आलेल्या यादी व्यतिरिक्त, अर्धसैनिक बल आणि पोलिसांसह वर्दीत असलेले केंद्रीय आणि राज्य सशस्त्र दल, अग्निशमन विभाग, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, राष्ट्रीय महामार्गांची पाहणी, सर्वेक्षण, बांधकाम किंवा ऑपरेशन करणारे लोक, मृतदेह घेऊन जाणारी वाहने, रक्षा मंत्रालय आणि दिव्‍यांगांसाठी तयार करण्यात आलेले मॅकेनिकल वाहनांनाही हा टॅक्स द्यावा लागणार नाही.

प्रवासानुसार भरावा लागेल टॅक्स - महत्वाचे म्हणजे, सिंगल जर्नीसाठी टोलची किंमत वेगळी असेल. तसेच, आपल्याकडे रिटर्न टोल टॅक्सचीही व्यवस्था असते. याशिवाय, हायवेवरून सातत्याने प्रवास करणारे लोक पासच्या सुविधेचाही वापर करू शकतात.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाकाroad transportरस्ते वाहतूकBJPभाजपा