शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आता आसाममध्ये भाषेवरून वाद, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "ब्लॅकमेलिंग नही चलेगी...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 22:30 IST

एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर...!

महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादानंतर, आता आसाममध्येही भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. आसाममधील जनगणनेदरम्यान एका अल्पसंख्याक विद्यार्थी नेत्याने बंगाली भाषिक मुस्लिमांना आसामीऐवजी बंगाली, हीच आपली मातृभाषा लिहिण्याचे आवाहन केले आहे. यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही इशारा दिला आहे. मुख्यमंत्र हिमंता बिस्वा सरमा यांनी, असमिया भाषा ही आसामची स्थायी राज भाषा असल्याचे म्हणत, कुणीही भाषेचा वापर ब्लॅकमेलिंगचे शस्त्र म्हणून करू नये, असे म्हटले आहे.

एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर... -भाषा वादाच्या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आसमिया ही आसामची स्थायी अधिकृत भाषा आहे. तिला घटनात्मक वैधता आहे. भाषेचा वापर ब्लॅकमेलिंग करण्याचे शस्त्र म्हणून करता येणार नाही. त्यांनी आसमिया त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तरी हे तथ्य बदलणार नाही. तथापि, जर एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर राज्यात किती बेकायदेशीर परदेशी आहेत हे उघड होईल." 

ऑल बोडोलँड टेरिटोरियल काउंन्सिल मायनॉरिटीच्या विद्यार्थी संघटनेचा नेता मैनुद्दीन अलीने, येत्या जनगणनेत बंगाली मुस्लिमांनी आसमिया ही मातृभाषा म्हणून लिहू नये, असे आवाहन केले होते. यामुळे हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. असे केल्यास आसमिया ही आसाममधील बहुसंख्य लोकांची भाषा राहणार नाही, अशे त्याने म्हटले होते.

विद्यार्थी नेत्याची पक्षातून हकालपट्टी -माध्यमांतील वृत्तांनुसार, विद्यार्थी नेत्याच्या या वादग्रस्त विधानानंतर, ऑल बोडोलँड टेरिटोरियल काउंन्सिल मायनॉरिटीने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याच बरोबर, संबंधित विद्यार्थी नेत्यानेही त्यांच्या या विधानासंदर्भात माफीही मागितली आहे.

टॅग्स :AssamआसामMuslimमुस्लीम