शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

आता शत्रूला भरेल भारताची धडकी; ‘विक्रांत’वर होणार तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 08:03 IST

२६ राफेल-एम, ३ पाणबुड्यांची खरेदी; पंतप्रधान माेदींच्या फ्रान्स दाैऱ्याआधी मंजुरी

नवी दिल्ली : भारताने गुरुवारी फ्रान्सकडून खास नौदलासाठी तयार करण्यात आलेली २६ राफेल-एम लढाऊ विमाने आणि स्कॉर्पिन श्रेणीच्या ३ पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्याच्या दिवशीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण सामग्री खरेदी परिषदेने (डीएसी) या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. भारताची ही खरेदी तब्बल ८० ते ८५ हजार कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे. 

सूत्रांनी सांगितले की, २६ राफेल-एम विमानांपैकी चार विमाने प्रशिक्षण विमाने असतील. राफेल-एम विमान नौदलासाठी डेक-आधारित विकसित प्रकार आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यापासून तीन वर्षांत विमानाची पहिली खेप प्राप्त होईल. किमतीबाबत तपशीलवार वाटाघाटी कराव्या लागत असल्यामुळे कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी एक वर्ष लागू शकेल. 

इतर देशांकडून तत्सम विमानांच्या तुलनेने खरेदी किमतीसह सर्व संबंधित बाबींचा विचार करून किंमत आणि खरेदीच्या इतर अटींबाबत फ्रेंच सरकारशी वाटाघाटी केल्या जातील. त्यानंतर, भारताने डिझाइन केलेल्या उपकरणांचे एकत्रीकरण, कार्यवाही हबची स्थापना कराराच्या दस्तऐवजात समाविष्ट केली जाईल. 

‘विक्रांत’वर होणार तैनातअधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय नौदल स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेसाठी २६ डेक-आधारित लढाऊ विमाने खरेदी करण्याचा विचार सुरू होता. नौदलाने बोईंग एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट आणि फ्रेंच कंपनी दसॉल्ट एव्हिएशनच्या राफेल विमानांच्या खरेदीसाठी दीर्घ विचारविनिमय केला. त्यात ‘राफेल-एम’ने बाजी मारली. भारतीय हवाई दलासाठी यापूर्वीच फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्यात आली. 

टॅग्स :Indiaभारत