शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता एन्काउंटर सुरू आहे, तुमच्याशी नंतर बोलतो... कर्नल मनप्रीत सिंह यांचा तो कॉल ठरला अखेरचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 07:24 IST

Indian Army: ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले.

श्रीनगर : ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले. बुधवारी अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांच्यासह  आणखी ३ जण शहीद झाले होते. कर्नल मनप्रीत सिंह शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या पत्नीलाही देण्यात आले नव्हते, ते केवळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व शहिदांच्या घरावर शोककळा पसरली, परंतु ते देशासाठी शहीद झाल्याचे सांगत त्यांनी भावनेपेक्षा कर्तव्यभावना मोठी हे दाखवून दिले.

शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंह हे चंडीगडचे रहिवासी होते आणि मेजर आशिष धौनक हे पानिपतचे रहिवासी होते. शहिदांच्या घरी सांत्वनासाठी नागरिकांची रीघ लागली आहे.

दोन दहशतवाद्यांना घेरले : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी अनंतनाग जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. काश्मीर पोलिसांनी शहिदांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, आमचे सैन्य दहशतवाद्यांना घेरण्यात निर्धाराने गुंतले आहे.

तो देशासाठी शहीद,  मी रडणार नाहीमी वीरपुत्राला जन्म दिला होता. माझा मुलगा देशासाठी शहीद झाला. मी त्याला नमन करीन. मी त्याला माझ्या मांडीवर घेईन, मी रडणार नाही. तो आम्हा सातही जणांना रडवत रडवत निघून गेला.    - मनजीत कौर(कर्नल  मनप्रित सिंह यांच्या आई) 

दोन महिन्यांच्या मुलीचे आभाळ हरवले...n दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्यांमध्ये पोलिस उपअधीक्षक हुमायून भट यांचाही समावेश आहे. हुमायून भट यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. भट यांचे वडील गुलाम हसन भट हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक (आयजी) आहेत. n मुलाचा मृतदेह घरी आणण्यात आल्यानंतर गुलाम हसन भट यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी ते काही वेळ स्तब्ध उभे राहिले. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिस दलात नोकरी धोक्याची आहे, हे ते स्वत: महानिरीक्षक राहिलेले असल्यामुळे त्यांना चांगलेच माहीत होते.

नवीन घर पाहिलेच नाही...मेजर आशिष हे २ वर्षांच्या मुलीचे वडील होते. त्यांचे कुटुंब सध्या सेक्टर-७ मध्ये भाड्याच्या घरात राहते. त्यांनी टीडीआय सिटीमध्ये आपले नवीन घर बांधले होते. त्यांचे मामा महावीर यांनी सांगितले की, ते ३ दिवसांपूर्वी आशिषशी फोनवर बोलले. २३ ऑक्टोबरला आशिष रजा घेऊन नवीन घर पाहायला येणार होते. मात्र, त्यापूर्वीच ते शहीद झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर