शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आता कपडे येणार तुमच्या मापाचे; मोजमापाबाबत देशी-विदेशी उत्पादकांना मार्गदर्शक सूचना जारी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 08:14 IST

वस्त्रोद्योग सचिव रचना शहा यांनी ही माहिती येथील फिक्कीच्या परिषदेत मंगळवारी दिली. 

नवी दिल्ली : सणासुदीला रेडिमेड कपडे खरेदी करायचे व आपल्याला फिट बसावे यासाठी त्यात आल्ट्रेशन करून घ्यायचे, ही सर्वांनाच सतावणारी कटकट आता संपणार आहे. कारण केंद्र सरकार लवकरच भारतीयांच्या मापानुसार कपडे तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना कापड उद्योगातील कंपन्यांना पाठवणार आहे. वस्त्रोद्योग सचिव रचना शहा यांनी ही माहिती येथील फिक्कीच्या परिषदेत मंगळवारी दिली. 

सध्या रेडिमेड कपड्यांच्या दुकानात ‘स्मॉल’, ‘मीडियम’, ‘लार्ज‘, ‘एक्सएल’, ‘एक्सएक्सएल’ आदी फिटिंगचे कपडे मिळतात. भारतात देशी असो वा आंतरराष्ट्र्रीय सर्व ब्रँडचे कपडे याच मापात विकसे जात असतात. हे कपडे तयार करताना निश्चित केलेली मोजमापे प्रामुख्याने अमेरिका आणि इंग्लंड या देशांत वापरली जातात. या देशातील लोकांची एकूण देहयष्टी तसेच उंची आणि भारतीयांची शरीररचना यात आमूलाग्र फरक आहेत. त्यामुळे या मापातील कपडे भारतीयांना फिट बसतातच असे नाही. 

२५ हजार जणांची मोजमापे घेणार 

भारतीयांच्या मापाच्या कपड्यांसाठी मानके व नियम निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यासाठी देशभरातून १५ ते ६५ या वयोगटातील तब्बल २५ हजार पुरुष आणि महिलांची मोजमापे घेतली जाणार आहेत. या माहितीच्या आधारे भारतीयांच्या मापानुसार कपड्यांची मोजमापे निश्चित केली जातील. हीच मापे नंतर देशातील तसेच देशाबाहेरील कापड उत्पादक तसेच किरकोळ विक्रेत्यांना दिली जाणार आहेत. 

एकूण मागणी लक्षात घेता यापुढे या मोजमापानुसारच कपडे तयार केले जावेत, असा आग्रह धरला जाणार आहे.

या संकलनासाठी थ्रीडी होल बॉडी स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन जमा केलेल्या माहितीचा वापर पुढच्या काळात ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, कला व खेळ आदी क्षेत्राशी संबंधिक उपकरणे तयार करताना होणार आहे.

कापड उद्योगात फायबर होणारा वापर तसेच इतर अनेक ॲप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी आवश्यक संशोधन करण्याकडे सरकारने भर दिला आहे. या क्षेत्रात प्रशिक्षित रोजगार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. टेक्लिकल टेक्टाईल या क्षेत्रात परदेशी गुंतणवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल.     - रचना शाह, फिक्की परिषद 

टॅग्स :businessव्यवसाय