शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

आता शाळा शिकविणार नाहीत मुघलांचा इतिहास, उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 07:28 IST

एनसीईआरटीची पुस्तके स्वीकारल्याने झाला बदल

लखनौ: उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी उत्तर प्रदेश मंडळ आणि सीबीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना यापुढे शाळांमध्ये मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. एनसीईआरटीने जून २०२२ मध्ये मुघल इतिहास, शीतयुद्ध इत्यादी प्रकरणे काढली होती. उत्तर प्रदेश मंडळाने एनसीईआरटीची पुस्तके आणि त्यांचा अभ्यासक्रम राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, आज किंवा या महिन्यात कोणताही नवीन धडा काढला नाही. यापूर्वी असे वृत्त होते की, उत्तर प्रदेश सरकारने इतिहासाच्या पुस्तकातून काही राज्यकर्ते आणि मुघल दरबारावरील धडे काढले आहेत. अकरावीच्या पुस्तकातून इस्लाम संस्कृतीचा उदय, संस्कृतींचा संघर्ष, औद्योगिक क्रांती, काळाची सुरुवात आदी धडे काढून टाकल्याचेही वृत्त होते. २०२० मध्ये सरकारने आग्रा येथील संग्रहालयाचे नाव  बदलल्यानंतर योगींनी ट्वीट केले होते की, ‘आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. नव्या उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतीकांना स्थान नाही.

या आधीही घेतले अनेक निर्णय

मुघलांचे नाव आणि इतिहासाबाबत योगी सरकारने यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. २०२० मध्ये योगी सरकारने आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केले. 

नागरिकशास्त्राच्या पुस्तकातही बदल

उपमुख्यमंत्री बृजेश पाठक म्हणाले की, लोक आपल्या संस्कृतीपासून वंचित होते, आम्ही लोकांना खरी संस्कृती सांगू. आता बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकलेल्या विषयांत ‘अकबरनामा’ (अकबराच्या कारकीर्दीचा अधिकृत इतिहास) व ‘बादशाहनामा’ (मुघल सम्राट शाहजहानचा इतिहास) समाविष्ट आहे. याशिवाय नागरिकशास्त्राच्या पुस्तकातही बदल करण्यात आले आहेत. स्वतंत्र भारतातील राजकारणाच्या पुस्तकातून जनआंदोलनांचा उदय आणि एका पक्षाच्या वर्चस्वाचा काळ हा अध्यायही बदलण्यात आला आहे.

भाजप सरकार मुस्लिमांविरोधात जे काही काम करू शकते, ते सर्वकाही करत आहे; परंतु केवळ उत्तर प्रदेशातून मुघल राजवटीचा इतिहास काढून काही होणार नाही. हा इतिहास केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात मजबूत आहे. मुघल सम्राटांनी भारताला प्रगतीच्या मार्गावर नेले. सरकारने जुनी इतिहासाची पुस्तकेही जप्त करावी, जेणेकरून काहीही पुरावा राहणार नाही. -नवाब इकबाल महमूद, माजी माध्यमिक शिक्षणमंत्री, आमदार, सपा

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशEducationशिक्षणMuslimमुस्लीम