नवी दिल्ली : डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत, रेल्वेने बुधवारी पेपरलेस तिकीट सेवा पुरविणारे एक मोबाईल अॅप जारी केले. या मोबाईल अॅपद्वारे पेपरलेस अनारक्षित ई तिकीट उपलब्ध होईल आणि प्रवाशांना तिकीट खिडकीजवळ तासन्तास रांगेत उभे राहण्यापासून मुक्ती मिळेल.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे रेल्वे माहिती प्रणाली केंद्राच्या मुख्यालयात आयोजित समारोहात या सेवेचे उद्घाटन केले. आजपासून चेन्नई एग्मोर ते ताम्बरम स्थानकादरम्यान ही सेवा सुरूकरण्यात आली. पुढील टप्प्यात मुंबईकरांना या सेवेचा लाभ मिळेल. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट खिडकीवरील गर्दीच्या रेट्यातून कायमची सुटका मिळेल. उण्यापुऱ्या पाच मिनिटात अनारक्षित तिकीट त्यांना मिळू शकेल. शिवाय यामुळे मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आता रेल्वेचे ‘पेपरलेस’ तिकीट
By admin | Updated: April 23, 2015 02:05 IST