शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आता रॉबर्ट वाड्रा ईडीच्या रडारवर, दिल्ली हायकोर्टाकडे मागितली कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 15:37 IST

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाराच्या प्रकरणांवरून केलेल्या कारवायांमुळे खळबळ उडालेली आहे.

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाराच्या प्रकरणांवरून केलेल्या कारवायांमुळे खळबळ उडालेली आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. तर महाराष्ट्रातील मातब्बर नेते शरद पवार यांच्याविरोधात शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा नोंदवला होता. आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे ईडीच्या रडारवर असून, मनीलाँड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी वाड्रा यांना ताब्यात घेण्यास परवानगी देण्याची विनंती ईडीने दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. आता या प्रकरणी 5 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.मनी लाँड्रिंगच्या काही प्रकरणांमध्ये रॉबर्ट वाड्रा यांचा थेट संबंध आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे. सध्या रॉबर्ट वाड्रा हे तपासकार्याला पुरेसे सहकार्य करत नाही आहेत, असे  ईडीने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले.  लंडनमधील 12, ब्रायनस्टन स्क्वेअर येथील 17 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या खरेदीमध्ये मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी सुरू आहे. दरम्यान, वाड्रा यांचा पैशांच्या देवघेवीमध्ये थेट संबंध आहे. त्यामुले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करायची आहे, असे ईडीच्या वकिलांनी न्यायमूर्तींना सांगितले.  दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांनी ईडीच्या वकिलांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. ईडी माझ्या अशिलाला जेव्हा जेव्हा बोलावते. तेव्हा ते त्यांच्यासमोर हजर होतात. तसेच तपासामध्येही संपूर्ण सहकार्य करतात. आतापर्यंत ईडीने जे प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे माझ्या अशिलांनी दिली आहे. मात्र आरोप मान्य न करणे याचा अर्थ तपासाला सहकार्य करत नाहीत, असा होत नाही, असा टोलाही वाड्रा यांच्या वकिलांनी लगावला. दरम्यान, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 5 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालयrobert vadraरॉबर्ट वाड्रा