शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आता पंजाबही पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 09:35 IST

यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम चारवेळा रद्द झाला होता.

पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानचे पाणी रोखण्याचे संकेत दिलेले असताना आता पंजाब सरकारनेही या दिशेने पाऊल उचलले आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये आज मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज पठानकोट येथे धरणाच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. 

यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम चारवेळा रद्द झाला होता. जिल्हाधिकारी रामवीर यांनी रावी येथिल विश्रामगृहावर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत धरणाच्या जागेचीही पाहणी केली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती दिली. पंजाब सरकारने या धरणासाठी 206 कोटी रुपये मंजूर केले असून एकूण खर्च 2700 कोटी रुपये अपेक्षित आहे. 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू आहे. आता सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली असून, त्यानुसार काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडचे पाणी पळविण्याचा थेट इशाराच देऊन टाकला होता. पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी केलेले महत्वाचे मानले जात होते. अखेरीस यासंदर्भातील घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.

केंद्र सरकारच्यावतीने सिंधू जल कराराविषयी माहिती देताना  गडकरींनी सांगितले की पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या धरणांमधून रोखण्यात येईल. त्यानंतर हे पाणी पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये प्रवाहित करण्यात येईल. उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका सभेमध्ये गडकरी यांनी पाकिस्तानला तोंडचे पाणी पळविण्याचा इशारा दिला होता. भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीला जोडू आणि पाकिस्तानला ओसाड बनविण्याची धमकीच त्यांनी दिली आहे. या तिन्ही नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. याद्वारे जलवाहतुकही सुरु केली जाईल असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Punjabपंजाबpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNitin Gadkariनितीन गडकरी