शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आता रस्त्यांवरून बिनधास्त चालू शकतील लोक, अपघात होणार नाही! नवा रोड सेफ्टी अ‍ॅक्शन प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 09:46 IST

सर्वोच्च न्यायालयाने पादचाऱ्यांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता MoRTH ने नवा रस्ते सुरक्षा आराखडा अथवा रोड सेफ्टी प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन लागू झाल्यानंतर रस्त्यावरून चालणाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. कुठल्याही प्रकारच्या अपघाताची पर्वा केल्या शिवाय त्यांना सहजपणे चालता येईल. सर्वोच्च न्यायालयाने पादचाऱ्यांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सर्व ROs, PlUs आणि RSOS ना आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याअंदर्गत रस्त्याचे डिझाईन, रस्त्याचे बांधकाम तसेच संचालन आणि व्यवस्थापन करताना पादचाऱ्यांच्या सुविधेसंदर्भातही लक्ष द्यावे लागेल. यामुळे रस्त्यांवर चालणे सुरक्षित, आरामदायक होईण्यास मदत मिळेल. 

पादचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि करण्यात येणाऱ्या तरतुदी -- रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अडथळा येणार नाही असा पादचारी मार्ग, रस्ता आणि पादचारी मार्ग यातील अंतर स्पष्ट असावे, तसेच तो दिव्यांग फ्रेंडली असावा.- सुरक्षिततेसाठी संपूर्ण पॅसेजला फेन्सिंग असणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे, केवळ त्याच ठिकाणी हे खुले असेल.- रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग, त्यावर सिग्नल व सूचना फलक लावावेत.- हे FOB देखील असू शकते, परंतु त्यावर दिव्यांगांसाठी आवश्यक व्यवस्था करावी लागेल.- सायकल आणि पादचारी मार्गांवर, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्त्यांवरही दर 20-30 मीटरवर पथदिव्यांची व्यवस्था असावी.- 4 मीटर एवढ्या उंचीवर लायटिंग व्यवस्था असावी. जर कमी अंतरावर संपूर्ण प्रकाशाची खात्री केली असेल तर याची आवश्यकता नाही. - सायकल अथवा पायी चालताना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यकता भासल्यास अंडरपास केले जातील. जेणेकरून यामुळे वाहनांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार नाही आणि पायी प्रवासही सुरळीत होईल.- प्रत्येक फूट ओव्हर ब्रिजची उंची आणि रुंदी पुरेशी असावी, त्यावर चढण्यासाठी पायऱ्या आणि रॅम्प/स्केलेटर असावेत.- ज्या ठिकाणी पादचाऱ्यांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी दोन ठिकाणांदरम्यान रस्त्यांच्या दोन्ही बाजूला लिफ्ट आणि कनेक्टिंग ब्रिज असावा.- किती पादचारी, किती दिव्यांग प्रवासी आणि किती सायकलस्वार आहेत, हे मोजण्यासाठी मॅन्युअल/मशीन काउंटिंगसाठी उपकरणे अथवा थर्ड पार्टीची मदत घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.- रस्ता आणि पादचारी मार्ग तयार करताना, परिसरातील लोक, शाळा, रुग्णालये, पंचायत, उद्योग संघटना आदींचा सल्लाही घ्यावा. जेणेकरून आवश्यक आणि शास्त्रोक्त पद्धतीने डिझाइन करता येईल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयroad transportरस्ते वाहतूक