शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आता आधारसाठी ऑफलाइन व्हेरिफिकेशन, डेटा सुरक्षेची चिंता होणार दूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 09:37 IST

खासगीपणा आणि डेटा सुरक्षेबाबत नागरिकांना असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाइन पर्यायांवर भर देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

नवी दिल्ली - खासगीपणा आणि डेटा सुरक्षेबाबत नागरिकांना असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेआधार कार्डच्या व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाइन पर्यायांवर भर देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यामध्ये ऑथेंटिकेशनसाठी UIDAI सर्व्हरची गरज भासणार नाही. आधार व्हेरिफिकेशनसाठी सरकार क्यूआर कोड आणि पेपरलेस केवायसीची योजना घेऊन येत आहे. ज्यामध्ये बायोमॅट्रिक डिटेल तसेच आधारच्या सर्व्हरचा वापर करण्याची गरज भासणार नाही.  याअंतर्गत केवायसी प्रक्रियेसाठी युझर्सना आपला आधार क्रमांकसुद्धा द्यावा लागणार नाही. त्यामुळे युझर्सच्या खासगी माहितीचा दुरुपयोग आणि त्यांच्या ट्रॅकिंगची शंका समाप्त होईल. आधार व्हेरिफिकेशनची ऑफलाइन  प्रक्रिया प्रायव्हेट कंपन्यांसाठी बायोमेट्रिक प्रणालीवर आधारलेल्या आधार ऑथेंटिकेशनसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पूर्णपणे पालन करतील.  ऑफलाइन केवायसीला सरकारसह सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर  वापरू शकतील. ऑफलाइन आधार केवायसीला ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पायपोर्ट आणि पॅनकार्डव्यतिरिक्त वापरता येऊ शकेल. आधार केवायसीची विश्वसनीयता याला पर्यायाला लोकप्रिय बनवेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. क्यूआर कोड UIDAI च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड आणि प्रिंट करून घेता येणार आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर या संकेतस्थळावरून क्यूआर कोड रीडरला डाऊनलोड करू शकतो किंवा आधार कार्ड नंबर प्रिंटआऊटवरील क्यूआर कोड वाचरणारा स्कॅनर वापरू शकतात. तसेच UIDAI ने पेपरलेस लोकल ई-केवायसीचा सुद्धा प्रस्ताव ठेवला आहे. याला मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये ठेवता येईल.  दरम्यान, ई-केवायसी आणि क्यूआर कोडमुळे खासगीपणाचे रक्षण होईल. तसेच याव्यतिरिक्त युझर्सना वैयक्तिक माहितीमध्ये केवळ आपले नाव आणि पत्ता द्यावा लागेल. ई-केवायसीच्या माध्यमातून आधार कार्ड क्रमांक न देताच बँक खाते उघडणे आणि सिम कार्ड मिळवणे शक्य होणार आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारतGovernmentसरकार