प्रतीक मुकणे, मुंबई - या निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांपैकी ४२ टक्के म्हणजेच २२६ खासदार हे दुसर्यांदा निवडून आले आहेत; तर तीन खासदार तब्बल नऊ वेळा संसदेवर गेलेत. यामध्ये रामविलास पासवान, कमलनाथ आणि पी.ए. संगमा यांचा समावेश आहे. तर १५व्या लोकसभेचे सदस्य राहिलेले १७१ खासदार हे १६व्या लोकसभा निवडणुकीतदेखील निवडून आले आहेत. १५व्या लोकसभेतून १६व्या लेकसभेत जाणारे सर्वाधिक १८ खासदार हे पश्चिम बंगालमधील आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकातील १७ आणि महाराष्टÑातील १६ खासदार आहेत.
‘अब की बार’ ३१५ नवीन खासदार
By admin | Updated: May 26, 2014 03:07 IST