शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

आता भारतालाही भूकंपाचा धोका; तुर्की आणि सीरियासंदर्भात आधीच इशारा देणाऱ्या डच संशोधकांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 06:33 IST

काँक्रीट आणि पॉलिमर फायबरसह केलेले बांधकाम यामुळे भारतातील इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत. त्यामुळे भूकंपातून वाचण्याची शक्यता अधिक असते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

ॲमस्टरडॅम : तुर्की आणि सीरियाला भूकंपाचा धक्का बसेल असा अंदाज वर्तविणारे डच संशोधक फ्रँक हॉगरबीटस यांनी स्पष्ट केले आहे की, भारतालाहीभूकंपाचा धोका आहे. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात फ्रँक हॉगरबीटस म्हणतात की, अफगाणिस्तानात मोठा भूकंप होईल आणि त्याचे धक्के पाकिस्तान आणि भारतातही बसतील. एका ट्विटर यूजर्सने फ्रँक यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

या व्हिडीओमध्ये होगरबीटस असे म्हणत आहेत की, वातावरणातील चढउतार पाहिल्यास अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशात भूकंपाचे धक्के बसू शकतात. परंतु, हे लक्षात ठेवा की, हे अंदाज आहेत. विशेष म्हणजे, या संशोधकांनी ३ फेब्रुवारी रोजी एका ट्विटमध्ये हा इशारा दिला होता की, तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन या देशांमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप होईल. 

तुर्की, सीरियात ६ रोजी झालेल्या भूकंपानंतर त्यांच्या भविष्यवाणीचे ट्विट व्हायरल झाले होते. फ्रँक यांनी भूकंपानंतर आणखी धक्के बसतील असाही अंदाज वर्तविला होता. दरम्यान, तुर्कीत बांधकामाला परवानगी देताना आधुनिक बांधकाम नियम पाळण्यात आले नाहीत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

भारतातील इमारती भूकंप प्रतिरोधक - काँक्रीट आणि पॉलिमर फायबरसह केलेले बांधकाम यामुळे भारतातील इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत. त्यामुळे भूकंपातून वाचण्याची शक्यता अधिक असते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर येथील संशोधकांनी नवीन आणि जुन्या इमारतीच्या बांधकामांची पाहणी केली आहे. बीम (आडवा खांब) आणि कॉलमचाही त्यांनी अभ्यास केला आहे. 

भारतीय बेपत्ता- उत्तराखंडमधील एक इंजिनिअर विजय कुमार (३६) हे तुर्कीत झालेल्या भूकंपानंतर बेपत्ता आहेत. - ते एक महिन्याच्या ऑफिस टूरवर तुर्कीत गेलेले आहेत, असे त्यांचे भाऊ अरुण कुमार यांनी सांगितले. - बेपत्ता विजय कुमार हे बंगळुरू स्थित एका कंपनीत काम करतात. ते २३ जानेवारी रोजी तुर्कीत पोहचले. त्यानंतर एकदा त्यांच्याशी बोललो असे अरुण यांनी सांगितले.   

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारतPakistanपाकिस्तान