शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आता देशातील नागरिकांसाठी आधार सारखं 'युनिक हेल्थ आयडी', सुविधाही मिळणार     

By ravalnath.patil | Updated: October 14, 2020 21:10 IST

Digital Health ID :15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' सुरू करण्याची घोषणा केली होती.

ठळक मुद्देएनडीएचएम अंतर्गत एक लाखाहून अधिक युनिक हेल्थ आयडी तयार करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात सहा राज्यात झाली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातील नोंद (Health Record) ठेवण्यासाठी सुरू केलेल्या 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' (NDHM) अंतर्गत आधार कार्ड सारख्या विशेष डिजिटल हेल्थ आयडीची (Digital Health ID) सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

या मिशन अंतर्गत, जर एखाद्या भारतीय नागरिकाला आपले हेल्थ आयडी कार्ड बनवायचे असेल तर त्याच्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही. दरम्यान, 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत देशातील रूग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा हेल्थ कार्डमध्ये एकत्रित केला जाणार आहे. यामुळे सहजपणे उपचारांची नोंद सुरक्षित राहील.

युनिक हेल्थ आयडीमध्ये या सुविधा मिळणार हेल्थ आयडी तुमच्या प्रत्येक आजाराची नोंद ठेवली जाणार आहे. तसेच, तुम्ही किती वेळा डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे आणि उपचारादरम्यान तुम्हाला देण्यात आलेल्या औषधांची नोंद देखील या हेल्थ आयडीमध्ये असणार आहे. पोर्टेबल असल्यामुळे हे हेल्थ आयडी कार्ड रूग्ण तसेच डॉक्टरांसाठीही उपयुक्त ठरेल. आपल्या हेल्थ आयडी कार्डमध्ये आधार आणि मोबाइल नंबर असणार आहे. तसेच, हेल्थ आयडी कार्ड नंबर सुद्धा प्रत्येक व्यक्तीसाठी आधार नंबरसारखा अनोखा असणार आहे.

'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'मध्ये आपला हेल्थ आयडी, डिजिटल डॉक्टर, आरोग्य सुविधा रेजिस्ट्री, वैयक्तिक आरोग्याची नोंद, ई-फार्मसी आणि टेलिमेडिसिनचा समावेश असेल. इतकेच नाही तर राज्यातील लोकांच्या आरोग्याच्या आकडेवारीच्या आधारे सरकार सुद्धआ चांगले आरोग्य कार्यक्रम करू शकतात. मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांनी म्हटले आहे की, 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'मुळे चांगले आर्थिक परिणाम पाहायला मिळतील.

>> पंतप्रधान मोदींनी  15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, एनडीएचएम देशाच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती आणेल.

>> एनडीएचएम अंतर्गत एक लाखाहून अधिक युनिक हेल्थ आयडी तयार करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात सहा राज्यात झाली आहे.

>> एका रिपोर्टनुसार, डिजिटल हेल्थ मिशनमुळे देशातील जीडीपी वाढेल. येत्या 10 वर्षांत जीडीपीमध्ये 250 अब्ज डॉलर्सची वाढ होईल.

>> केंद्राने असे आश्वासन दिले आहे की, सुरक्षा लक्षात घेऊन डिजिटल हेल्थ रेकॉर्ड पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

>> केंद्राच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे रूग्णाला चांगल्या सुविधा मिळतील आणि डॉक्टरांना योग्य उपचार करण्यासाठी मदत मिळेल. 

टॅग्स :Healthआरोग्यNarendra Modiनरेंद्र मोदी