शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

आता अपंग मुले जन्मालाच येणार नाहीत! शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केले अनेक अवयव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:07 IST

गर्भाशयात भ्रूण टिकवून ठेवणाऱ्या द्रवातून पेशी काढून हे अवयव विकसित करण्यात आले आहेत. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज (लंडन) आणि ग्रेट ऑर्मड स्ट्रीट हॉस्पिटलचे हे संशोधन नेचर मेडिसीनमध्ये प्रकाशित झाले आहे.

नवी दिल्ली : विज्ञानाच्या जगात पुन्हा एकदा एक चमत्कार घडला आहे.  प्रयोगशाळेत लहान आकाराची फुप्फुसे आणि इतर अवयव वाढवण्यात ब्रिटिश शास्त्रज्ञांना यश आले आहे. शास्त्रज्ञांनी या अवयवांना ‘मिनी-ऑर्गन्स’ असे नाव दिले आहे. या शोधामुळे भविष्यात गर्भाच्या आजारांवर उपचार करण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. गर्भाशयात भ्रूण टिकवून ठेवणाऱ्या द्रवातून पेशी काढून हे अवयव विकसित करण्यात आले आहेत. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज (लंडन) आणि ग्रेट ऑर्मड स्ट्रीट हॉस्पिटलचे हे संशोधन नेचर मेडिसीनमध्ये प्रकाशित झाले आहे.

नेमका फायदा काय होणार? - हे छोटे अवयव नवीन औषधे विकसित करण्यासाठी आणि अवयवांचे कार्य समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या शोधामुळे मूल जन्माला येण्यापूर्वीच जन्मजात आजारांवर उपचार करता येऊ शकतात.- याशिवाय गर्भातील बाळाला आवश्यक पोषणही पुरवले जाऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. - संशोधकांनी १२ गर्भवती महिलांच्या गर्भाशयातून पेशी गोळा केल्या. हे नमुने नियमित चाचणीदरम्यान घेण्यात आले. या पेशींपासून लहान अवयव विकसित केले गेले.

शास्त्रज्ञांनी काय केले? युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधक मॅटिया गेर्ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गर्भाशयातून काढलेल्या स्टेम पेशी या गर्भाच्या पेशी होत्या.

गर्भधारणेदरम्यान, असे असणे सामान्य आहे. शास्त्रज्ञांनी पेशी वेगळ्या केल्या आणि त्या कोणत्या अवयवाच्या आहेत, त्या ओळखल्या.

यातील काही पेशी फुप्फुसाच्या, काही मूत्रपिंडाच्या तर काही आतड्यांच्या होत्या. याच आधारावर लहान अवयव विकसित केले गेले.

प्रत्येक देशाचा कायदा..ब्रिटनमध्ये गर्भपाताची मर्यादा २२ आठवडे आहे. त्यानंतर, गर्भाशयातून पेशी घेता येत नाहीत. अमेरिकेमधील बहुतेक राज्यांमध्ये संशोधनासाठी गर्भाच्या पेशी घेणे कायदेशीर आहे. अमोनिया द्रव्यातून पेशी घेणे, गर्भ किंवा आईसाठी कोणत्याही प्रकारे धोकादायक नाही. हे फक्त नियमित तपासणीसाठी वापरले जाते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :scienceविज्ञानdoctorडॉक्टर