शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

आता पासपोर्ट बनवणे झाले खूपच सोपे, पीसीसी मिळणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 18:12 IST

Passport : परराष्ट्र मंत्रालयाचा (MEA) हा निर्णय पासपोर्ट अर्जदारांसाठी (Passport Applicants) निश्चितच दिलासा देणारी बातमी आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही पासपोर्ट (Passport) बनवणार असाल आणि त्याच्या पडताळणी प्रक्रियेबद्दल (Verification Process) काळजी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दरम्यान, आता पासपोर्ट मिळवणे आणखी सोपे झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट अर्जदार पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (PCC) पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

परराष्ट्र मंत्रालयाचा (MEA) हा निर्णय पासपोर्ट अर्जदारांसाठी (Passport Applicants) निश्चितच दिलासा देणारी बातमी आहे. आता या कामासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा 28 सप्टेंबरपासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होणार आहे. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (PCC) अर्जदार सर्व पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर (POPSK) ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, पासपोर्ट जारी करण्याच्या प्रक्रियेत, पोलीस पडताळणीचे काम सर्वात जास्त वेळ घेणारे आहे.

पासपोर्ट जारी करण्यासाठी नोडल मंत्रालय असलेल्या परराष्ट्र मंत्रालयाने अर्जदारांना भेडसावणाऱ्या समस्येचे बऱ्याच अंशी निराकरण केले आहे. पोलीस पडताळणीमध्ये स्थानिक पोलिसांमार्फत पडताळणी केली जाते, त्यानंतर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या मागणीत जोरदार वाढ होत असल्याने परराष्ट्र मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची मागणी वाढल्यामुळे देशातील सर्व पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सुविधेशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 28 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यासह, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी आगाऊ अपॉइंटमेंट देखील घेतली जाऊ शकते.

पासपोर्ट अर्जदारांना मोठा दिलासा पासपोर्ट अर्जदारांसाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे. दरम्यान, निवासी स्थिती, रोजगार किंवा दीर्घकालीन व्हिसा आणि इमिग्रेशनसाठी अर्ज करताना हे आवश्यक आहे, तर हे सर्टिफिकेट पर्यटक व्हिसावर परदेशात जाणाऱ्या लोकांना दिले जात नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या या निर्णयामुळे पासपोर्ट अर्जदारांना दिलासा मिळणार असून लांबलचक प्रक्रियेतून सुटका होणार आहे. याचा फायदा केवळ परदेशात नोकरीच्या आशेने असलेल्या भारतीय नागरिकांना होणार नाही तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या इतर मागण्या पूर्ण करण्यातही मदत होईल.

टॅग्स :passportपासपोर्ट