शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आता ८४ औषधे मिळणार स्वस्तात; किमतीमध्ये बदल, सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 10:12 IST

कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासाठी सूचित केलेल्या फॉर्म्युलेशनच्या किमतीही निश्चित केल्या आहेत.

नवी दिल्ली : सध्या उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून,  केमिस्ट अधिक किमतीने औषधे विकत असल्याचेही समोर आले आहे. यावर अंकुश लावण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) ८४ औषषांच्या किमती निश्चित केली आहे. यामुळे कोणताही औषध विक्रेता अधिक किमतीने औषधे विकू शकणार नाही. यामुळे मधुमेह, डोकेदुखी, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासाठी सूचित केलेल्या फॉर्म्युलेशनच्या किमतीही निश्चित केल्या आहेत. औषध (किंमत नियंत्रण) आदेश, २०१३ च्या अधिकारांचा वापर करून,  एनपीपीएने औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत, असे नियामकाने एका अधिसूचनेत म्हटले आहे.

तापाच्या गोळ्यांचीही ‘ताप’ झाला कमीपॅरॉसिटोमॉल कॅफीन टॅब्लेट २.८८ रुपये, रोसुवास्टानिन ॲस्पिरीन अँड क्लोपिडोग्रेल कॅप्सुल १३.९१ रुपये आणि वोग्लिबोस अँड मेटफोर्मिन हायड्रोक्लाराइड गोळी १०.४७ रुपयांनी मिळणार आहे.एनपीपीएने नुकतीच औषधांच्या किमतीमध्ये सुमारे १०.७६ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे पॅरासिटेमोल, ॲन्टीरेबीज, अमॉक्सीसिलीन यासारखी प्रतिजैविके, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (व्हिटॅमीन) इत्यादी आवश्यक ८००हून अधिक औषधांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याची झळ वैद्यकीय क्षेत्रासह सामान्य लाेकांनाही बसत आहे.

काय म्हटले अधिसूचनेत?एनपीपीएने औषध कंपन्यांना निश्चित केलेल्या किमतींचे कठोरपणे पालक करण्याचे आदेश दिले आहेत. असे न केल्यास त्यांनी वसूल केलेल्या अतिरिक्त रकमेवर व्याजासह दंड भरावा लागणार आहे. किमतीमध्ये बदल झाल्यानंतर जीएसटी हा वेगळा असेल. मात्र त्यासाठी वेगळे नियम आहेत. जर कोणताही विक्रेता या औषधांसाठी अधिक किंमत घेत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :medicinesऔषधं