CoronaVirus Updates: नोव्हेंबरने तारले! सणवार असूनही दीड वर्षातील सर्वात कमी कोरोनाबाधित सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 02:08 PM2021-12-01T14:08:32+5:302021-12-01T14:09:13+5:30

CoronaVirus Cases in November 1.5 years Low: यंदाच्या मे महिन्यानंतर सलग सहाव्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. 6 मे रोजी 24 तासांत देशभरात 4,14,188 कोरोना रुग्ण सापडले होते. आज, बुधवारी देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली आली आहे.

November 2021 records lowest number of fresh corona Virus cases in India since May 2020 | CoronaVirus Updates: नोव्हेंबरने तारले! सणवार असूनही दीड वर्षातील सर्वात कमी कोरोनाबाधित सापडले

CoronaVirus Updates: नोव्हेंबरने तारले! सणवार असूनही दीड वर्षातील सर्वात कमी कोरोनाबाधित सापडले

Next

नवरात्र, दिवाळी, छट आदी सण असूनसुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षी मे 2020पासून आतापर्यंतचे सर्वात कमी कोरोनाबाधित (CoronaVirus Positive) सापडले आहेत. नवरात्रीचा सण हा ऑक्टोबरमध्ये होता. छट पूजाही त्यानंतर होती. दिवाळी पहिल्याच आठवड्यात असल्याने नोव्हेंबरमध्ये (November) रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता होती. परंतू त्या उलट झाले आहे. 

नोव्हेंबर महिन्यात 3.1 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासूनचा सर्वात कमी आहे. ओमायक्रॉनच्या सावटाच्या तोंडावर ही दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात कोरोना लसीकरण वेगाने झाल्याने रुग्णसंख्येत घट झाली आहे. आता ओमायक्रॉनच्या सावटामुळे केंद्र आणि राज्य सरकारने टेस्टिंग वाढविण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून टेस्टिंग कमी झाले होते. याचाही परिणाम कोरोनाच्या आकडेवारीवर दिसत आहे. 

यंदाच्या मे महिन्यानंतर सलग सहाव्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. 6 मे रोजी 24 तासांत देशभरात 4,14,188 कोरोना रुग्ण सापडले होते. आज, बुधवारी देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली आली आहे. हा आकडा जवळपास 547 दिवसांपेक्षा कमी आहे. 

देशात पहिला कोरोनाचा रुग्ण केरळमध्ये 30 जानेवारी, 2020 मध्ये सापडला होता. 7 ऑगस्ट 2020 ला देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाखावर पोहोचला. यानंतर लगेचच 23 ऑगस्टला 30 लाख पार झाला. 5 सप्टेंबर 2020 मध्ये 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबर 2020 ला 1 कोटी कोरोना रुग्णांचा आकडा पार झाला होता. 

आजची आकडेवारी काय सांगते...
आजपर्यंत देशात 3.46 कोटी रुग्णांचा आकडा पार झाला आहे. तर 4.69 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 8,954 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10207 रुग्ण बरे झाले आहेत. आज अॅक्टिव्ह रुग्ण 99,023 आहेत. लसीकरण 1,24,10,86,850 एवढे झाले आहे.

Web Title: November 2021 records lowest number of fresh corona Virus cases in India since May 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.