शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:00 IST

या कारवाईदरम्यान डिव्हीएफ टीमने कुंजम हिडमा नावाच्या कट्टर नक्षलवाद्याला यशस्वीरित्या अटक केली.

Naxalite Hidma Arrested: नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमा याला आज(दि.29) अखेर अटक केले. त्याच्याकडून एके-47 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजम हिडमा याला ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील बैपारीगुडा पोलिसांनी पेटगुडा जंगलातून अटक केली. कोरापूट पोलिस आणि डीव्हीएफच्या संयुक्त कारवाईत त्यांना यश मिळाले आहे.

वृत्तसंस्था ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, डीव्हीएफ टीमने 28 मे रोजी रात्री एक विशेष ऑपरेशन सुरू केले होते. सकाळी या टीमला नक्षलवाद्यांचा एक गट टेकडीवर तळ ठोकताना दिसला. टीम नक्षलवाद्यांना घेराव घालण्यासाठी पुढे जाताच त्यांनी डीव्हीएफ टीमवर गोळीबार सुरू केला आणि जंगलात पळून गेले. गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून टीमनेही गोळीबार केला. यादरम्यान, झुडुपात लपण्याचा प्रयत्न करणारे माओवादी पकडले गेले. 

कुंजम हिडमाला अटकया कारवाईदरम्यान डिव्हीएफ टीमने कुंजम हिडमा नावाच्या कट्टर नक्षलवाद्याला यशस्वीरित्या अटक केली. त्याच्याकडून एके-47 रायफल, 35 जिवंत काडतुसे, 27 इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 90 नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 2 किलो गन पावडर, 2 स्टील कंटेनर, 2 रेडिओ, 1 इअरफोन, 1 मोटोरोला वॉकी-टॉकी, 10 बॅटरी, 2 चाकू, 1 कतुरी (लहान कुऱ्हाड), 4 टॉर्च लाईट, 15 माओवादी साहित्य आणि विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

कोण आहे कुंजम हिडमा?

कुंजम हिडमा उर्फ मोहन  नक्षली चळवळीतील एरिया कमिटी सदस्य होता. २००७ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी तो नक्षलवादी सांस्कृतिक शाखा बाल संघम आणि जन नाट्य मंडलीत सहभागी झाला. सांस्कृतिक सहभागापासून तो सैन्य प्रशिक्षण आणि नक्षली कारवायांमध्ये सहभागी झाला. २०१३ ते २०१५ या काळात हिडमाने उसुर लोकल ऑर्गनायझेशन स्क्वाड म्हणून पक्षाचा सदस्य म्हणून काम केले. सैन्य प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला सिंगल शॉर्ट रायफल जारी करण्यात आली. २०१६ मध्ये हिडमा आंध्र प्रदेश बॉर्डरवरील प्लाटून येथे काम करत होता. २०१९ मध्ये त्याला एरिया कमिटी सदस्य म्हणून पदोन्नती मिळाली. चांदमेटा, कोंडाझारी, कुंभीखारी, कोलेंगडब्बा येथील नक्षली हल्ल्यात त्याचा सहभाग होता.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादी