शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भगवान शिव हाजीर हो! देवाला न्यायालयाचे समन्स; ​​​​​​​गैरहजर राहिल्यास १०,००० दंडाची तंबी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:19 IST

हजर न राहिल्यास सर्वांना १० हजार रुपये दंड आणि जागेतून बाहेर काढण्याचा इशारा

- खुशालचंद बाहेतीरायपूर : छत्तीसगडच्या रायगड येथील तहसीलदार न्यायालयाने एका विचित्र आदेशात, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाच्या सुनावणीत भगवान शिव यांच्यासह १० जणांना समक्ष हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. हजर न राहिल्यास सर्वांना १० हजार रुपये दंड आणि जागेतून बाहेर काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.सुधा राजवाडे यांनी १६ जणांविरुद्ध सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची याचिका हायकोर्टात दाखल केली होती.  रायगड शहरातील प्रभाग क्रमांक २५ मधील कोहकुंडा परिसरातील शिवमंदिरही यात आहे.  हायकोर्टाने राज्य सरकार आणि तहसीलदारांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.प्राथमिक तपास आणि पाहणीतून १० जणांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले. यात  शिवमंदिराचाही समावेश आहे. या १० जणांना तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी कोर्टाने नोटीस बजावली आहे.तहसीलदारांच्या नोटिशीत  शिवमंदिराचे नाव  क्रमांक ६ वर आहे. नोटीस मंदिराच्या विश्वस्त, व्यवस्थापक किंवा पुजारी यांना दिलेली  नसून थेट भगवान शंकराला पाठविण्यात आली आहे. तहसीलदार कोर्टाच्या  नोटीसमध्ये भगवान शिव यांना तुमचे कृत्य छत्तीसगड जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत येते. याचा जाब देण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहावे. न राहिल्यास १० हजार रुपयांचा  दंड तसेच ताब्यात असलेल्या जमिनीतून निष्कासनास सामोरे जावे लागू शकते, असे नमूद केले आहे. देवाने जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असेही निर्देश दिले आहेत.तहसीलदार विक्रांतसिंह ठाकूर यांनी ही नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.  सरकारी मालमत्तेवरील अतिक्रमणाचा हा खटला आहे.पहिल्यांदाच नाहीयापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये, छत्तीसगड पाटबंधारे विभाग (चंपा जिल्हा) उपविभागीय अधिकारी जंजगीर-शाखा कालवा उपविभाग क्र. १ यांनी त्यांच्या मालकीची मालमत्ता रिकामी करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी विनंती देवाला केली होती. नोटीसमध्ये कोणत्याही ट्रस्ट किंवा समितीचा उल्लेख नव्हता. पटवारी हलका क्रमांक १० जंजगीर शाखा कालव्यातील १९८८ चौरस फूट जागेवर आपण अतिक्रमण केले असून सरकारी जमीन ताब्यात घेणे हा गुन्हा आहे, असेही भगवान भोलेनाथ यांना लिहिले होते.