शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीत काहीच ठेवलेलं नाही...! आमच्यापेक्षा चांगले पाणी-पुरीवाले; काय म्हणाले तहसीलदार साहेब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:55 IST

"आमच्यापेक्षा चांगले तर पानी-पुरी अथवा गोबी मंचुरियनचा ठेला चालवणारे आहेत. त्यांची कमाईदेखील आमच्यापेक्षा अधिक आहे."

कर्नाटकतील एका तहसीलदाराने सरकारी कार्यालयांतील कार्यप्रणाली आणि कर्मचाऱ्यांचा वाढत असलेला ताणतणाव यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तहसीलदार महोदयांचे म्हणणे आहे की, सरकारीनोकरीत काहीच ठेवलेले नाही, आमच्यापेक्षा चांगले तर पानी-पुरी अथवा गोबी मंचुरियनचा ठेला चालवणारे आहेत. त्यांची कमाईदेखील आमच्यापेक्षा अधिक आहे.

होलेनरसीपूर येथील तहसीलदार केके कृष्णमूर्ती हे तालुक राज्य सरकारी कर्मचारी संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "ठेला चलाणारे दबावापासून मुक्त होऊन आनंदात जीवन जगत आहेत. ते सुट्ट्यांवर जाऊ शकतात. शांततेत घरी परतू शकता आणि आपल्य जीवनाचा आनंद घेऊ शकतात. या उलट सरकारी अधिकारी नेहमीच तणावाचा सामना करत असतात. एवढेच नाही, तर आपल्या कुटुंबाला मंदिरातही नेऊ शकत नाहीत."

तहसीलदार साहेब पुढे म्हणाले, "तंत्रज्ञानामुळे कामाचा ताण कमी होण्याऐवजी वाढला आहे. वरिष्ठ अधिकारी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे कामांवर लक्ष ठेवतात. त्याच दिवसात निकाल मागतात. उशीर झाल्यास विभागीय चौशी होते अथवा चौकशीच्या नावाखाली धमकावले जाते."

मुलांना शिकवण्याऐवजी अंडी खाऊ घालताय शिक्षक -कृष्णमूर्ती पुढे म्हणाले, "गावातील लेखापाल सूडाच्या भीतीने त्यांच्या संघर्षाचा आवाज उठवू शकत नाहीत आणि शिक्षकांवर शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुलांना अंडी आणि नाश्ता वाटप करण्यासारख्या सरकारी योजनांच्या तणावाखाली आहेत.”

वाढते आजारपण आणि निवृत्ती -यावेळी तहसीलदार कृष्णमूर्ती यांनी, हाई ब्लड प्रेशर, शुगर तथा किडनी आणि लिव्हरच्या वाढत्या आजारपणांचा हवाला देत, अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात चिंता व्यक्त केली. एवढेच नाही तर, अत्यंतिक ताणतणावामुळे आपण स्वैच्छा निवृत्तीसंदर्भातही विचार करत आहोत, असेही यावेळी तहसीलदार साहेबांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीKarnatakकर्नाटक