शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Notes Ban Anniversary: मनमोहन सिंग म्हणाले, नोटाबंदी हा अपशकुनी निर्णय, जेटलींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 19:57 IST

सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

नवी दिल्ली- दोन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयानंतर देशातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. आज नोटाबंदीला दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षांनी मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तर सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला संकुचित विचारांनी घेतलेला अपशकुनी निर्णय, असं संबोधलं आहे. नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचं आता समोर आलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्ती प्रभावित झाल्या. मग ते कोणत्या धर्म, जाती किंवा पेशा, संप्रदायाचे असो. असं म्हणतात, एखादी जखम झाल्यास ती भरून निघते, परंतु नोटाबंदीमुळे झालेली जखम दिवसेंदिवस अजून खोलवर जाताना दिसत आहे. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. छोटे छोटे उद्योगधंदे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होता. तो नोटाबंदीमुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाला. अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरताना पाहायला मिळतेय.तरुणांना नोक-या नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारं कर्ज आणि बँक,  गैर वित्तीय संस्थांवर नोटाबंदीचा दुष्परिणाम झाला आहे. नोटाबंदीमुळेच रुपयाचा स्तर खाली येताना पाहायला मिळतोय, असं मनमोहन सिंग म्हणाले आहेत.तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे. नोटाबंदीला 2 वर्षं पूर्ण झाली आहेत. या निर्णयाचा उद्देश सफल झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काळ्या पैशात कमी आली आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये वाढ झाली आहे. नोटाबंदी हा अर्थव्यवस्थेतील पुनर्बांधणीतले महत्त्वाचे पाऊल असून, लोकांचा कडचा पैसा गोळा करणे हा नोटाबंदीचाही कधीही उद्देश नसल्याचंही अरुण जेटलींनी सांगितलं आहे. त्यांनी ब्लॉग लिहून याची माहिती दिली आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी