शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कामकाजात ‘दलित’ नव्हे, अनुसूचित जातीच, केंद्राचे निर्देश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 05:33 IST

सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये व कामकाजात दलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा शब्द प्रयोग करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

यवतमाळ - सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये व कामकाजात दलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा शब्द प्रयोग करण्याचे निर्देशकेंद्र सरकारने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.यवतमाळचे प्रा. योगेंद्र नगराळे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून या शब्दाविषयी माहिती मागितली होती. माहिती अधिकाराखालील त्यांचा अर्ज पीएमओने कायदा व न्याय मंत्रालयाकडे पाठविला. त्यावर भारतीय राज्यघटनेत दलित असा कुठेही उल्लेख नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर प्रा. नगराळे यांनी पंतप्रधान, राष्टÑपती, कायदा मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय आदींकडे वारंवार पत्रव्यवहार करून ‘दलित’ शब्द टाळण्याची मागणी केली.या पाठपुराव्याची दखल घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने १ आॅगस्ट रोजी यापुढे सरकारी कामकाजात दलित शब्द न वापरण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले. सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना हे पत्रपोहोचल्याची माहिती केंद्राने प्रा.नगराळे यांना पत्राने दिली. त्यानुसार सरकारी कागदपत्रे, कामकाज व प्रमाणपत्रांमध्ये, आदेशांमध्ये दलित शब्द वापरण्यावर बंदी घालली आहे. त्याऐवजी अनुसूचित जाती किंवा शेड्यूल कास्ट असा शब्द प्रयोग करण्याचे निर्देश केंद्राचे अवर सचिव दीपककुमार साह यांनी दिले आहेत. मध्यप्रदेश उच्च न्यायालयानेही १५ जानेवारी रोजी एका निकालात अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या व्यक्तींसाठी दलित शब्द वापरता येणार नसल्याचे म्हटले होते.इतरांनीही वापर टाळावाराज्यघटनेत दलित शब्द नसताना एका विशिष्टजाती समूहासाठी तो वापरणे चुकीचे व अपमानास्पद आहे. त्यामुळे दोन वर्षे मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. अखेर केंद्राने दलित शब्द वापरण्यास बंदी घालणारे पत्र सर्व राज्यांना पाठविले. सर्वसामान्यांनीही या शब्दाचा वापर टाळावा.- प्रा. योगेंद्र एस. नगराळे, वाघापूर रोड, यवतमाळहरिजन यापूर्वीच वगळला : मागासवर्गीयांसाठी पूर्वी वापरल्या जाणाऱ्या हरिजन शब्दाबाबतही वाद झाला होता. त्याची दखल घेत१० फेब्रुवारी १९८२ रोजी गृहमंत्रालयाच्या त्या निर्देशानुसार अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या जात प्रमाणपत्रांमध्ये हरिजन शब्द वापरण्यावर बंदी घालण्यात आली. 

टॅग्स :Governmentसरकारnewsबातम्या