शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी दवाखान्यासाठी ही वेळ नफा कमावण्याची नाही : गुजरात उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:07 IST

गुजरात उच्च न्यायालयाच्या अहमदाबाद खंडपीठासमोर स्वत: होऊन स्वीकारलेल्या कोविड १९ वरील उपचारासंबंधी जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हे आदेश देण्यात आले.

- खुशालचंद बाहेतीमुंबई : खाजगी दवाखान्यात कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर शासनाने ठरवावेत. ते सामान्य लोकांच्या आवाक्यात असतील असे ठेवावेत, असे गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला आदेश दिले आहेत.गुजरात उच्च न्यायालयाच्या अहमदाबाद खंडपीठासमोर स्वत: होऊन स्वीकारलेल्या कोविड १९ वरील उपचारासंबंधी जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हे आदेश देण्यात आले. या जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने यापूर्वी अनेक मुद्यांवर शासनाचा अहवाल मागितलाहोता.या सुनावणीत खाजगी दवाखान्यातील उपचाराचा मुद्दा उपस्थित झाला. साथरोग कायद्यांतर्गत निश्चित केलेल्या कोविड रुग्णालयात शासनाने निश्चित केलेल्या दरात उपचार होत आहेत. यात मुख्यमंत्री अमृत योजनेत ठरविलेल्या दरात थोडेफार वाढवून उपचार होतआहेत.मात्र, अहमदाबाद शहर व शहरालगतच्या इतर काही खाजगी दवाखान्यात खूप जास्त रक्कम आकारली जात आहे. ही रक्कम लाखोंच्या घरात आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात लोकांना उपचाराची गरज आहे, अशा वेळी प्रचंड मोठी फी आकारणे हे मानवताविरोधी आहे. यामुळे ही रुग्णालये काही श्रीमंत वगळता इतरांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत या महामारीच्या वेळी खाजगी दवाखान्यातील उपचारदेखील लोकांच्या आवाक्यात असले पाहिजेत. यासाठीचा खर्च योग्य प्रमाणातच द्यावा लागला पाहिजे.कोणत्याही परिस्थितीत खाजगी दवाखान्यांना प्रचंड रक्कम आकारण्याची परवानगी असता कामा नये. ही अत्यंत कठीण वेळ असून, व्यवसाय करण्याची व नफा कमावण्याची वेळ नाही. शासनाने संबंधितांशी बोलणी करून यातून मार्ग काढावा आणि लोकांसाठी जास्तीत जास्त रुग्णालये उपलब्ध करून द्यावीत.युद्धसदृश परिस्थितीत जेथे लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे उपचारासाठी प्रचंड रक्कम आकारणे हे अन्यायकारक आहे. ही रक्कग कमी केलीच पाहिजे. खाजगी दवाखाने जर ऐकत नसतील आणि जास्त फी आकारण्यावर ठाम असतील, तर न्यायालय त्यांच्याविरुद्ध कारवाई करील. प्रसंगी रुग्णालयाचे परवाने रद्द करण्यात येतील.-न्या. जे. बी. पारडीवाला आणि इलेश जे. व्होरा(गुजरात उच्च न्यायालय, अहमदाबाद खंडपीठ)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालय