शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:19 IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून १२ ऑगस्टपर्यंत चालणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी होत असतानाच पावसाळी अधिवेशनाची तारीख सरकारने जाहीर केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. १२ ऑगस्टपर्यंत ते चालेल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय प्रकरणाच्या कॅबिनेट समितीने या तारखांची शिफारस केली होती. या अधिवेशनासाठीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार असल्याचे रिजिजूंनी स्पष्ट केले. २३ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाची विधेयके संसदेच्या पटलावर ठेवली जाणार आहेत. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनात विमा सुधारणा विधेयक मांडले जाऊ शकते.

पळ काढण्यासाठी धडपड

पहलगाम हल्ला व दहशतवाद्यांवर कारवाईत सरकारला आलेले अपयश यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी काँग्रेस व इंडिया आघाडीकडून केली जात आहे. मात्र, विशेष अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी ४७ दिवस आधीच केंद्राने पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केल्याचा आरोप काँग्रेसने केला.

‘त्या’ न्यायाधीशांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव

सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली झालेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी  सुरू केली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी या विषयावर चर्चा करणार आहेत. मार्चमध्ये दिल्लीतील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर रोख रक्कम आढळल्याने ती जप्त केली होती.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनOperation Sindoorऑपरेशन सिंदूर