शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

एक-दोन नव्हे भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:59 IST

कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत ...

कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत आहे. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या देशांतील रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर भारतातही या विषाणूचे नवे उपप्रकार झपाट्याने पसरत आहेत. JN.1, NB.1.8.1, LF.7 आणि XFG हे ओमिक्रॉनचे उपप्रकार असून, त्यांचा संसर्ग वेगाने होत आहे. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांकमहाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण नोंदवले जात असून, गुरुवारी राज्यात ७६ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली. राज्यात जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ५९७ रुग्ण आढळले असून, सध्या ४२५ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १६५ रुग्ण बरे झाले असून, सात मृत्यू झाले आहेत. मृत्यू पावलेल्यांपैकी सहा जणांना इतर गंभीर आजार होते.

मुंबईत २७, पुण्यात २१, ठाणे महानगरपालिकेत १२, कल्याणमध्ये ८, नवी मुंबईत ४, कोल्हापूर आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी १ तर रायगड जिल्ह्यात २ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतच एकूण ३७९ रुग्ण नोंदले गेले आहेत.

राजस्थानातही संसर्गाची झपाट्याने वाढराजस्थानमध्ये गुरुवारी १५ नवे रुग्ण सापडले. त्यापैकी ९ रुग्ण जयपूरमध्ये आढळले. उर्वरित प्रकरणे जोधपूर (२) आणि उदयपूर (४) येथे नोंदवली गेली. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) तपासलेल्या नमुन्यांमधून XFG आणि LF.7.9 प्रकारांची उपस्थिती निष्पन्न झाली आहे. हे प्रकार सध्या प्रामुख्याने पश्चिम व दक्षिण भारतात आढळून येत आहेत.

कर्नाटक आणि चंदीगडमध्ये मृत्यूंची नोंदकर्नाटकातील एका ७० वर्षीय व्यक्तीचा एन्सेफॅलोपॅथी आणि इतर आजारांमुळे मृत्यू झाला, तर चंदीगडमधील सरकारी रुग्णालयात एका ४० वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशभरातील स्थितीसध्या भारतात १,२५२ सक्रिय कोविड रुग्ण आहेत आणि एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

लक्षणे आणि खबरदारीआरोग्यतज्ज्ञांनी सांगितले की रुग्णांमध्ये घसा खवखवणे, ताप, अतिसार, सौम्य पोटदुखी, थकवा आणि आवाजातील बदल अशी लक्षणे दिसून येत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR यांनी राज्यांना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि उच्च जोखमीच्या गटासाठी बूस्टर डोस देणे यावर भर दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य