श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा परत घेण्याबाबत आम्हाला पंतप्रधान मोदींनी कोणतेही संकेत दिले नाहीत. आता भारत सरकारवर कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही. एक देखील दिवस असा नाही जेव्हा ते खोटं बोलत नाहीत' असं म्हणत फारूख अब्दुल्ला यांनी निशाणा साधला आहे.
'हा महात्मा गांधी यांचा भारत नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा समाप्त केला. त्यानंतर दोन केंद्र शासित प्रदेश करण्यात आले. केंद्र सरकारचे हे पाऊल अनपेक्षित होते' असं फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. तसेच 'एक दिवसापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी मात्र जम्मू आणि काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत' असं देखील सांगितलं. एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे.
'राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जवान पाठवण्यात आले आहेत, त्याची गरज काय आहे, असे मी पंतप्रधानांना विचारले. पर्यटकांनाही जम्मू आणि काश्मीरमधून बाहेर काढण्यात येत होते. अमरनाथ यात्रा देखील रद्द करण्यात आली होती. हे सगळं विचित्रच होतं. जसे पाकिस्तानविरुद्ध युद्ध किंवा दुसरे काही तरी. आम्ही पंतप्रधानांना विचारले मात्र त्यांनी त्यावर काहीच म्हटलं नाही. त्यांनी आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या.'
तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सांगायचे आहे? असं फारूख अब्दुल्ला यांनी विचारण्यात आले. तेव्हा 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी प्रामाणिक व्हावे आणि त्यांनी सत्याला सामोरे जावे अशी मी त्यांना विनंती करेन. आता कोणीही सरकारवर विश्वास ठेवू शकणार नाही. हे अशक्य आहे. ते खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही. मला ताब्यात घेण्यात आल्याचं कळल्यावर धक्काच बसला. आम्ही नेहमीच देशासोबत उभे राहिलो. जे माझ्यासोबत घडले त्याची मी कल्पना देखील केली नव्हती' असं फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Video: 'एक साथ नमस्ते'; भारतीय संस्कृतीतील संस्कार असलेल्या 'नमस्कारा'ची जादू सातासमुद्रापार
CoronaVirus News : कडक सॅल्यूट! ...म्हणून हा चहावाला करतो कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार
विकृतीचा कळस! 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...