शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

लाच न दिल्याने खेळाडूला धावत्या रेल्वेतून ढकलले

By admin | Updated: July 25, 2015 01:55 IST

रेल्वे पोलिसांनी धावत्या रेल्वेतून ढकलल्यामुळे एका २७वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना

लखनौ : रेल्वे पोलिसांनी धावत्या रेल्वेतून ढकलल्यामुळे एका २७वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सिकंदरा राव रेल्वे स्थानकावर गुरुवारी घडली.होशियारसिंग असे मृत खेळाडूचे नाव आहे. गुरुवारी होशियारसिंग हा कासगंज-मथुरा पॅसेंजरमधून आपली आई, पत्नी आणि १० महिन्यांच्या मुलासह प्रवास करीत असताना ही घटना घडली. होशियारसिंगचा मृत्यू कसा झाला, याबद्दल अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आलेले नाही. तथापि होशियारसिंग हा आपल्या आजारी पत्नीला भेटण्यास पॅसेंजरच्या महिला डब्यात गेला असताना रेल्वे पोलिसांनी त्याला रोखले आणि २०० रुपयांची लाच मागितली. होशियारसिंगने लाच देण्यास नकार दिल्यावर रेल्वे पोलिसांनी त्याला धावत्या रेल्वेमधून खाली ढकलून दिले, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवि-ण्यात आलेले आहे आणि खेळा-डूच्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले. ‘पोलीस डब्यात आले व महिला डब्यात काय करतोस असे विचारल्यानंतर पोलिसांनी माझ्या पतीला धावत्या रेल्वेतून ढकलले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा दावा होशियारसिंगच्या पत्नीने केला.सदर घटना कशी घडली हे सांगताना होशियारसिंगचा धाकटा भाऊ मुनेशकुमारसिंग म्हणाला, ‘आम्ही सर्व कुटुंबीय कासगंज जिल्ह्याच्या पटियाली ब्लॉक येथे एक कार्यक्रम आटोपून मथुरेतील आपल्या घराकडे परत येत होतो. दुपारच्या वेळी आम्ही पॅसेंजरमध्ये बसलो. महिला नवजात बालकासह महिला डब्यात बसल्या आणि माझा भाऊ सामान्य डब्यात बसला. माझ्या वहिनीला अचानक घेरी आल्याने आईने भावाला फोन केला. त्यामुळे भाऊ सिकंदरा राव स्थानकावर डब्यातून उतरला आणि वहिनीला बघण्यासाठी महिला डब्यात चढला. तो डब्यात चढल्यावर दोन रेल्वे पोलिसांनी त्याला रोखले. पत्नी आजारी आहे. तिला एकदा बघू द्या, अशी विनवणी भावाने केली. पण पोलिसांनी त्याचे काहीही ऐकले नाही आणि डब्यात चढल्याबद्दल २०० रुपयांची लाच मागितली. माझ्या भावाने लाच देण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्याला धावत्या रेल्वेतून ढकलले.