शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

''दारू नाही पण पत्नीला सोडू शकतो''; मद्यपी वृद्धाचे भर न्यायालयात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 12:21 IST

भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयात एका 69 वर्षांच्या महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार केली आहे.

भोपाळ : मध्यप्रदेशच्या न्यायालयात नुकताच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील न्यायालयात एका वृद्ध महिलेने पालन पोषणासाठी पतीकडून पैसे मिळण्यासाठी दाद मागितली आहे. याला उत्तर देण्यासाठी न्यायालयात गेलेला तिच्या 89 वर्षीय पतीने न्यायालयात धक्कादायक बाब सांगितली आहे. यामुळे न्यायाधीशांसह उपस्थितांनाही धक्का बसला होता. 

भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयात एका 69 वर्षांच्या महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार केली आहे. यामध्ये तिने उदरनिर्वाहासाठी पैसे मिळण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायाधिशांनी जेव्हा दोघांना समजाविण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेने आयुष्याच्या उतारवयात पतीसोबत राहण्यास नकार दिला. यावर तिला कारण विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, तिचा पती दररोज दारू पिऊन मारहाण करतो. यावर न्यायधीश आरएन चंद यांनी महिलेच्या पतीला समजाविण्याचा प्रयत्न केला. तसेच दारू सोडण्यास सांगितले. यावर या वृद्धाचे उत्तर ऐकून तेही अचंबित झाले. 

मी आयुष्यभर दारू पित आलो आहे. आता जर दारू सोडली तर मरून जाईन. याआधी दोनवेळा दारू सोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आजारी पडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते. तेव्हा डॉक्टरने सांगितले होते की दारू कमी कर, पण थोडी पित जा. आता दारू तेव्हाच सुटेल जेव्हा मला मरण येईल, असे या वृद्धाने न्यायाधीशांना सांगितले. याचबरोबर मी दारुसाठी पत्नीला सोडण्यास तयार असल्याचेही त्याने सांगताच उपस्थितांना धक्का बसला. 

मी किरकिर करणाऱ्या पत्नीला सोडू शकतो, पण दारू नाही असे सांगत त्याने पत्नीला दर महिन्याला 10 हजार रुपये देण्याच्या निर्णयाला लगेचच होकारही देऊन टाकला. 

टॅग्स :Courtन्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेश