शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ६ नव्हे, ८ हजार?; अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 07:10 IST

पंतप्रधान सन्मान निधीत होणार वाढ, अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फ्रेबुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी दोन हजारांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे.

सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८ हजार केली जाऊ शकते. सध्या सन्मान निधी वर्षभरात तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. मोदी सरकारच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केला होता. केंद्र सरकारची ही सर्वांत मोठी योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात आली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

लोकप्रिय अर्थसंकल्प मांडणार? आगामी वर्षात देश लोकसभा निवडणुकांना सामोरा जात आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून मांडण्यात येणारा हा अर्थसंकल्प अंतरिम असेल. निवडणुकीनंतर निवडून आलेले सरकार उरलेल्या आर्थिक वर्षाचा लेखानुदान तयार करते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांप्रमाणेच महिला, आदिवासी, आर्थिक दुर्बल घटक, उद्योगपती, कामगार आदी घटकांना काही ना काही देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळेच अंतरिम असला तरी या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा केल्या जातील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

११कोटी कुटुंबांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. 

२.६० लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीBudgetअर्थसंकल्प 2023Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन