शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

काश्मीर खोऱ्यात सामान्य व्यवहार विस्कळीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:58 IST

सार्वजनिक वाहतूक बंद; शाळकरी मुले राहिली घरीच

श्रीनगर : काश्मीर खोºयात बुधवारी सलग ५२ व्या दिवशी सर्वसामान्य व्यवहारांवर परिणाम झालेलाच होता. सार्वजनिक वाहतूक होऊ शकली नाही, तर येथे काही मोजक्याच विक्रेत्यांनी आपली दुकाने लावली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.मुख्य बाजारपेठा आणि इतर व्यावसायिक आस्थापना बंदच होत्या. तथापि, येथील टीआरसी चौक-लाल चौकात काही विक्रेत्यांनी दुकाने लावली होती. सार्वजनिक वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणावर बंद होती. मात्र, आंतरजिल्हा कॅब्ज आणि काही ऑटोरिक्षा शहरातील काही भागांत जा-ये करताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. खासगी कार्सची वाहतूक मात्र कोणत्याही अडथळ्याविना सुरू होती. राज्य सरकारने शैक्षणिक संस्था उघडण्याच्या केलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही. कारण शाळांमध्ये वर्गच झाले नाहीत. कारण पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेची खात्री नसल्यामुळे त्यांना घरीच राहू दिले.मोबाईल सेवा उत्तरेत हंडवारा आणि कुपवाडा वगळता अजूनही बंदच आहे, तर इंटरनेट सेवा संपूर्ण खोºयात अद्यापही बंद आहे. योग्य वेळी इंटरनेट, तसेच मोबाईल सेवा विशेषत: लीजड लाइन्स आणि बीएसएनएल ब्रॉडबँड सुरू करण्याचा विचार करतील. (वृत्तसंस्था)संवेदनशील ठिकाणी सुरक्षादले तैनातकाश्मीर खोºयात देशविरोधी तत्त्वे हिंसाचार भडकवण्यासाठी मोबाईल आणि इंटरनेट सेवांचा गैरवापर करतील, अशी अधिकाºयांना भीती आहे. संपूर्ण खोºयात कुठेही बंधने नाहीत; परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील ठिकाणी सुरक्षादले तैनात करण्यात आली आहेत.जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेला घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू आणि काश्मीर व लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश ५ आॅगस्ट रोजी निर्माण केले. त्या दिवसापासून पहिल्यांदा संपूर्ण काश्मीरमध्ये निर्बंध लागू केले गेले होते. खोºयात टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवले गेले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSchoolशाळा