शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी तर आर्थिक दहशतवादच! यशवंत सिन्हा पुन्हा कडाडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 05:00 IST

नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत

अकोला : नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला. ते अकोला येथे बोलत होते.शेतकरी जागर मंचच्यावतीने सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नोटाबंदी, जीएसटी आणि अर्थव्यवस्थेवरून सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला आपल्या टिकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, माझ्या लेखानंतर देशभरातून आलेल्या प्रतिक्रिया या देशात काहीतरी चुकत आहे, हे स्पष्ट करणाºया आहेत. हे चांगले संकेत आहेत. सरकार चुकत आहे, हे कुणीतरी सांगितले पाहिजे. त्यासाठी राजशक्तीपेक्षाही मोठी शक्ती असलेल्या लोकशक्तीचा लढा उभारण्याची गरज आहे.देशाची अर्थव्यवस्था सध्या विचित्र स्थितीत आहे. शेतकरी संकटात, व्यापारी त्रस्त, युवकांना नव्या नोकºया नाहीत, त्यामुळे समाजातील कोणताच घटक खुश नाही. मुळात जीएसटीमध्येच अनेक त्रुटी आहेत. त्यामुळेच हा ‘गुड अ‍ॅण्ड सिम्पल’ टॅक्स न राहता ‘बॅड अ‍ॅण्ड कॉम्प्लिकेटेड’ टॅक्स झाला आहे. जीएसटीमधील विसंगती दूर करा, अन्यथा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका होईल, असा इशाराही त्यांनी दिला.नोटाबंदी ही पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सर्वच व्यवहार आॅनलाइन करण्याचा निर्णय झाला. लाइनही नाही अन् आॅनही नाही, असा हा हास्यास्पद प्रकार ठरला. बदल वेगाने होत नसतात, त्याची गती किमान एका लयीत असावी लागते. नोटाबंदीनंतर दोन लाख शेअर कंपन्यांची व १८ लाख लोकांची चौकशी सुरू झाली आहे, हे नोटाबंदीचे वास्तव आहे, यावर काय बोलावे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.या सरकारचे शेतीचे धोरणही अजबच आहे. महाराष्टÑात नाफेडने शेतकºयांकडून तूर, मूग, उडीद खरेदीचा निर्णय घेतला; मात्र प्रतिएकर दोन क्विटंल खरेदीची टाकलेली अट ही हास्यास्पद आहे. जर उत्पादनच एकरी पाच ते आठ क्विंटल असेल, तर खरेदीला बंधन का? ही अट तत्काळ कमी केली पाहिजे, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.‘मित्रों’ टाळणार म्हटले; पण आलेच!यशवंत सिन्हा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना बंधू-भगिनींनो, अशी केली आणि जाणीवपूर्वक ‘मित्रों’ म्हटले नाही, असे स्पष्टीकरण दिल्यावर सभागृहात हशा उमटत टाळ्यांचा गजर झाला; मात्र सिन्हा यांनी भाषणाच्या ओघात दोन वेळा ‘मित्रों’ म्हटल्यावर त्यांनी अब क्या करे, सुनने की आदत पडी, असे सांगत दोस्तों असे म्हणणार असल्याचे स्पष्ट करून सभागृहाचे लक्ष वेधले....तर लेख कशाला लिहिला असता ?मला अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडत नाही? मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता? असा सवाल सिन्हा यांनी केला.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपाNote Banनोटाबंदी