शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

मल्ल्यांवर अजामीनपात्र अटक वॉरंट

By admin | Updated: August 7, 2016 01:49 IST

उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या अडचणी वाढतच असून दिल्लीतील एका न्यायालयाने धनादेश न वटल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट काढले आहे.

नवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या अडचणी वाढतच असून दिल्लीतील एका न्यायालयाने धनादेश न वटल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट काढले आहे. मल्ल्या यांना हजर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत. महानगर दंडाधिकारी सुमीत आनंद यांनी मल्ल्या यांना ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाद्वारे अजामिनपात्र अटक वारंट बजावले जावे, असे या आदेशात म्हटले आहे. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्याचे सांगितले जाते. वारंवार समन्स बजावूनही मल्ल्या न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना हजर करण्यासाठी सरकारी यंत्रणेने हस्तक्षेप करणे गरजेचे झाले असल्याचे न्यायालयाने म्हटले. डायल कंपनीने धनादेश न वटल्या प्रकरणी मल्ल्यांना कोर्टात खेचले आहे. ही कंपनी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन सांभाळते. मल्ल्यांची कंपनी किंगफिशर एअरलाईन्सने डायलला २२ फेब्रुवारी २०१२ रोजी एक कोटी रूपयांचा धनादेश दिला होता. मात्र, तो वटला नाही. डायलने जून २०१२ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सच्या ७.५ कोटी रूपयांच्या धनादेशाशी संबंधित चार प्रकरणे दाखल केली आहेत. किंगफिशरने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेतलेल्या सेवेच्या बदल्यात हे धनादेश दिले होते. मल्ल्या यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेली किंगफिशर एअरलाईन्सचे ही कंपनी सध्या बंद पडली असून, मल्ल्यांकडे विविध बँकांची नऊ हजार कोटी रूपयांची थकबाकी असून बँकांनी थकबाकीच्या वसूलीसाठी न्यायालयात त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. गेल्या महिन्यात मुंबईत हवाला व्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते न्यायालयात हजर झाले नाहीत. मल्ल्या यावर्षी मार्चमध्ये देशातून पळाले होते. ते ब्रिटनमध्ये असल्याचे बोलले जाते. त्यांच्याविरुद्ध धनादेश न वटल्याची अनेक प्रकरणे दाखल आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)