शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा गेला; अडीच वर्षांची लेक उघड्या चेंबरमध्ये पडली, सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:49 IST

एका अडीच वर्षांच्या चिमुकलीचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला.

पाटण्यातील नौबतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोएडा येथील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण सरासत गावातील आहे. गुरुवारी एका अडीच वर्षांच्या चिमुकलीचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. ही मुलगी अंगणवाडी केंद्रातून घरी परतत असताना वाटेत असलेल्या एका उघड्या चेंबरमध्ये पडली. रात्री उशिरा तिला चेंबरमधून बाहेर काढण्यात आलं परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सकाळी १० च्या सुमारास घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या अंगणवाडी केंद्रात गेली होती. सुटल्यानंतरही जेव्हा ती घरी परतली नाही, तेव्हा कुटुंबीय अंगणवाडीत चौकशी करायला गेले. तिथे समजलं की मुलगी अंगणवाडी सुटल्यावर कधीच निघून गेली आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने शोध सुरू केला, मात्र ती कुठेच सापडली नाही.

मुलगी न सापडल्यामुळे तिचं अपहरण झालं असावं अशी शंका कुटुंबीयांना आली. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. याच दरम्यान गावकऱ्यांचं लक्ष रस्त्यावरील एका उघड्या चेंबरकडे गेलं. संशय आल्याने एका काठीच्या साहाय्याने तिथा शोध घेतला असता, मुलीची बॅग दिसली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मोटर लावून नाल्यातील पाणी उपसण्यास सुरुवात झाली. पाणी कमी झाल्यावर मुलगी चिखलात अडकलेली आढळली.

मुलीला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नौबतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मंजीत ठाकूर यांनी सांगितलें की, सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उघडे चेंबर झाकण्याची आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

संतप्त नातेवाईकांनी अंगणवाडी सेविकेवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सेविकेने मुलीला घरापर्यंत सोडलं असतं, तर हा अपघात टळला असता असं त्याचं म्हणणं आहे. रिया कुमारी असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील राकेश कुमार हे मजुरीचं काम करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Toddler Dies After Falling Into Open Chamber in Patna

Web Summary : In Patna, a two-and-a-half-year-old girl died after falling into an open chamber while returning from Anganwadi. Her body was found after a search. Villagers demand safer infrastructure. The family accuses the Anganwadi worker of negligence.
टॅग्स :BiharबिहारDeathमृत्यू