शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Video-फटाक्यांऐवजी 'या' परिवारानं गोळीबार करत साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:05 IST

दिल्लीच्या नोएडामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

नोएडा- दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची समस्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु तरीही परिस्थितीत फार काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही आहे. फटाके फोडल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे श्वास घेणं मुश्कील झालं आहे. याच दरम्यान दिल्लीच्या नोएडामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या व्हिडीओमध्ये गोळीबार करत दिवाळी साजरी करत असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुटुंबातील इतर सदस्यांना वारंवार हवेत गोळीबार करायला सांगतोय. तसेच त्याचं ऐकून महिला आणि लहान मुलेही गोळीबार करत आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ नोएडातल्या हरोला गावातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हिडीओमधल्या शॉल घेऊन असलेल्या व्यक्तीचं नाव मनोज जैन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोजचा हरोला गावात व्यवसाय आहे.मनोज जैन गाडीत बसून लोकांना गोळीबार करायला सांगत होता. त्यानंतर लोक गोळीबारही करत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये मनोज स्वतः गोळीबार करत असल्याचंही पाहायला मिळतंय. त्याला सरकारी नियमांची कोणतीही चिंता नसल्याचंही या व्हिडीओत दिसतंय. तसेच हा गोळीबार करत असलेला व्हिडीओ कुटुंबातीलच कोणी तरी बनवल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हिडीओत मनोजजवळ बंदुका असल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून, मनोज दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.