शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

नोटाबंदी म्हणजे सरकारी त्सुनामी - पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 05:14 IST

नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे

मुंबई : नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ही सर्वात मोठी ‘मानवी चूक’ ठरली आहे. त्सुनामी, मुंबईतील पूर अशा नैसर्गिक संकटापेक्षा जास्त नुकसान नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेआहे, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी केली.विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने ‘नोटाबंदी आणि जीएसटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात चिदंबरम बोलत होते. याप्रसंगीमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते गुरुदास कामत, संजय निरुपम, नसीम खान, जनार्दन चांदूरकर आदी नेते उपस्थित होते. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदी एक प्रकारचा आर्थिक घोटाळा आहे. काळ्या पैसेवाल्यांना मदत करण्यासाठी, काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली. या नोटाबंदीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच त्यावर जीएसटीचा घाव घालण्यात आला. जीएसटी ही एक चांगली करप्रणाली आहे. मात्र, केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने तिची अंमलबजावणी केल्याचे चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारने जीएसटीला बदनाम केल्याचेही ते म्हणाले.आर्थिक आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सामान्य नागरिकांच्या हालअपेष्टांकडे सरकारचे लक्ष नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे झालेले नुकसान रोखण्याची अजूनही संधी आहे. परंतु आपला निर्णय चुकल्याचे या सरकारला मान्यच करायचे नाही. त्यामुळे घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आता लोकांनीच योग्य व्यक्तींच्या हातात सत्ता सोपविण्याची गरज असल्याचे चिदंबरम म्हणाले.काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास जीएसटी करप्रणालीत सुधारणाकेली जाईल. १८ टक्क्यांहून अधिक जीएसटी आकारला जाणारनाही. छोट्या आणि मध्यमउद्योगांना सहा महिन्यांतून एकदाच रिटर्न भरावा लागेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.शेतकी उत्पन्न, नोकºया, घटते बालमृत्यूदर आणि निर्यात ही चांगल्या अर्थव्यवस्थेची लक्षणे आहेत. सध्या देशात या चारही घटकांची स्थिती चांगली नाही. देश सध्या रोजगारशून्य विकास अनुभवत असून असा विकास टाइमबॉम्बसारखा असतो. नवीन रोजगारही तयार झाला नाही. उलट नोटाबंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीला धाडसी निर्णय म्हणत असले तरी हानिर्णय शेतकºयांच्या आत्महत्यांप्रमाणे आहे. आत्महत्येचा निर्णयही धाडसी असला तरी चुकीचा असतो, असेही चिदंबरम म्हणाले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसNote BanनोटाबंदीGSTजीएसटीBJPभाजपा