वाड्रा-डीएलएफ करारात नियमांचे उल्लंघन नाही, ‘महसूल’चा अहवाल, पोलिसांकडून तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:31 AM2023-04-16T09:31:30+5:302023-04-16T09:33:01+5:30

डीएलएफला ३.५ एकर जमीन विकण्यात आली होती आणि या व्यवहारात कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही, असा अहवाल तहसीलदारांनी दिल्याचे हरयाणा पोलिसांनी तयार केलेल्या स्थितीदर्शक अहवालात म्हटले आहे.

No Violation of Rules in Vadra-DLF Deal, 'Revenue' Report, Investigation by Police | वाड्रा-डीएलएफ करारात नियमांचे उल्लंघन नाही, ‘महसूल’चा अहवाल, पोलिसांकडून तपास

वाड्रा-डीएलएफ करारात नियमांचे उल्लंघन नाही, ‘महसूल’चा अहवाल, पोलिसांकडून तपास

googlenewsNext

चंडीगड  : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई राॅबर्ट वाड्रा आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याविरोधात दाखल प्राथमिक माहिती अहवालाशी (एफआयआर) संबंधित आपल्या तपासात हरयाणाच्या महसूल अधिकाऱ्यांना वाड्रा यांच्या स्कायलाइट हाॅस्पिटॅलिटीकडून डीएलएफला झालेल्या वादग्रस्त जमिनीच्या हस्तांतरणात काहीही गैरप्रकार आढळून आलेला नाही. हरयाणा पोलिस मात्र या करारादरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी तपासत आहेत. 
डीएलएफला ३.५ एकर जमीन विकण्यात आली होती आणि या व्यवहारात कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही, असा अहवाल तहसीलदारांनी दिल्याचे हरयाणा पोलिसांनी तयार केलेल्या स्थितीदर्शक अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

 काय आहे प्रकरण? 
फेब्रुवारी २००८ मध्ये शिकाेहपूर येथील वादग्रस्त ३.५ एकर जमीन ओंकारेश्वर प्राॅपर्टीजकडून स्कायलाईट हाॅस्पिटॅलिटीजने ७.५ काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. व्यावसायिक परवाना मिळाल्यानंतर ही जमीन डीएलएफला ५८ काेटी रुपयांमध्ये विकण्यात आल्याचा आराेप आहे. या माेबदल्यात तत्कालीन हुड्डा सरकारने वजिराबाद येथील ३५० एकर जमीन डीएलएफला दिल्याचाही आराेप आहे. 

Web Title: No Violation of Rules in Vadra-DLF Deal, 'Revenue' Report, Investigation by Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.