शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको; व्होडाफोनचा ताबा घेण्यास इच्छुक नाही- सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 13:20 IST

बाजारात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडिया (व्हीआयएल) ने स्पेक्ट्रम लिलावाच्या हप्त्यांशी संबंधित १६ हजार कोटींच्या व्याजाची रक्कम आणि एजीआर थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिल्यानंतर व्होडाफोनआयडियावर सरकारचे नियंत्रण येणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र या कंपनीचा ताबा घेण्यास इच्छुक नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. बाजारात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

व्हीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर ठक्कर यांनी बुधवारी म्हटले की, सध्याचे प्रवर्तक कंपनीच्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि चालवण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहेत. सरकारने व्यवस्थापन ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सरकारने पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केल्याने या क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या चिंता दूर होण्यास मदत झाली आहे. व्हीआयएल रक्कम उभारणीसाठी आपल्या याेजना सुरूच ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या कंपनीत आता केंद्र सरकारची हिस्सेदारी ३५.८ टक्के असणार आहे. जर असे झाले तर सरकार कंपनीच्या सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक होणार आहे. कंपनीवर सध्या १.९५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ठक्कर म्हणाले की, थकबाकीवरील व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्याच्या पर्यायाबाबत दूरसंचार विभागाच्या पत्रात सरकारला संचालक मंडळावर ठेवण्याची कोणतीही अट नाही. ते पुढे म्हणाले की, विद्यमान प्रवर्तक कंपनीच्या कामकाजाचे व्यवस्थापन हाती घेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत.

सरकार म्हणते, तुम्हीच कंपनी चालवा आणि पुढे न्या

कंपनी ताब्यात घेण्याची सरकारची कोणतीही इच्छा नाही. सरकारला बाजारात तीन खासगी कंपन्या हव्या आहेत. बाजारामध्ये केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी सरकारला नको आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनीच कंपनी चालवावी आणि ती पुढे न्यावी, असे सरकारने स्पष्ट केले असल्याचे ठक्कर यांनी स्पष्ट केले आहे. येणाऱ्या महिन्यात याबाबतची प्रक्रिया पूर्ण होण्याची त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडिया