शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

फोन टॅपिंगबाबत एनएसओशी कोणताही व्यवहार केला नाही; केंद्र सरकारची संसदेत स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:38 IST

पेगॅससचा वापर करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काही राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, उद्योजक यांच्यासह भारतातील ३०० जणांवर पाळत ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांनी केला होता.

नवी दिल्ली : पेगॅसस तंत्रज्ञान विकत घेण्यासंदर्भात इस्रायली कंपनी एनएसओबरोबर केंद्र सरकारने कोणताही व्यवहार केलेला नाही असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी स्पष्ट केले आहे.पेगॅससचा वापर करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काही राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, उद्योजक यांच्यासह भारतातील ३०० जणांवर पाळत ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांनी केला होता. या पाळत प्रकरणावरून विरोधकांनी संसदेच्या कामकाजात अडथळे आणले होते. पेगॅसससंदर्भात माकपचे खासदार डॉ. व्ही. शिवदासन यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना अजय भट म्हणाले की, पेगॅससची निर्मिती करणाऱ्या एनएसओ ग्रुप या कंपनीबरोबर केंद्र सरकारने कोणताही व्यवहार केलेला नाही. कोणावरही अवैधरित्या पाळत ठेवण्यात आलेली नाही असे केंद्र सरकारने याआधी स्पष्ट केले होते. मात्र त्याने समाधान न झाल्याने खासदार डाँ. शिवदासन यांनी एनएसओबाबत सरकारला थेट प्रश्न विचारला होता. पेगॅसस प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. पेगॅसस तंत्रज्ञान फक्त कोणत्याही सरकारला व त्याच्या यंत्रणांनाच विकण्यात येते असे एनएसओ कंपनीने म्हटले होते. त्यामुळेही विरोधकांनी पेगॅसस प्रकरणी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.