शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

"टीएमसीच्या कुण्याही अत्याचाऱ्याला सोडणार नाही, एकाएकाचा हिशोब चुकता करू...!"; कोलकात्यात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:04 IST

यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर थेट शब्दांत हल्ला चढवला.

कोलकाता - पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड मैदानात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर थेट शब्दांत हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुमचा हा उत्साह आणि जोश बंगालच्या मनात काय चालले आहे, हे स्पष्टप करणारा आहे. ब्रिगेड परेड ग्राउंडचा इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जेव्हा बंगाल देशाला दिशा देतो, तेव्हा हे मैदान बंगालचा आवाज बनते. एकेकाळी याच मैदानातून इंग्रजी सत्तेविरुद्ध उठलेला आवाज संपूर्ण भारतात क्रांतीचे रूप धारण करून उठला होता, ज्याचा परिणाम म्हणजे इंग्रजांच्या अत्याचाराचा आणि लुटीचा शेवट झाला. आज पुन्हा एकदा याच मैदानातून नव्या बंगालच्या क्रांतीचे बिगुल वाजले आहे."

बंगालमधील बदलाचे वारे आता केवळ भिंतींवर लिहिलेले नाही, तर लोकांच्या मनातही दिसत आहेत, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, "आता बंगालमधील या 'निर्दयी' सरकारचा अंत निश्चित आहे. राज्यातील महाजंगलराज आता संपुष्टात येईल, म्हणूनच बंगालच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येत आहे - 'चाई बीजेपी सरकार, अबकी बार'!"

'खरा चोर कोण, हे जनता जाणते  -सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांना तृणमूल काँग्रेसने 'चोर' म्हणून हिणवल्याचा उल्लेख करत मोदींनी संताप व्यक्त केला. "खरे चोर कोण? हे बंगालची सुजाण जनता चांगल्या प्रकारे ओळखते. आपली सत्ता जात असल्याचे पाहून येथील सरकार आता सैरभैर झाले आहे. आम्ही टीएमसीच्या कुण्याही अत्याचाऱ्याला सोडणार नाही, एकाएकाचा हिशोब चुकता करू," असा थेट इशाराही यावेळी मोदी यांनी दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Modi vows to hold TMC accountable in Kolkata rally.

Web Summary : Prime Minister Modi addressed a Kolkata rally, attacking Mamata Banerjee's TMC government. He promised accountability for TMC's wrongdoings, stating Bengal desires change and the current government's end is near, promising BJP's governance.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारण