शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Kathua Rape Case : जम्मू काश्मीरमधील घटनांमुळे पीडीपी-भाजपा सरकारला धोका नाही - राम माधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 16:41 IST

जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसून हे सरकार उत्तम प्रकारे काम करत असल्याचे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले.

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसून हे सरकार उत्तम प्रकारे काम करत असल्याचे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले. या दोन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले आहे. जम्मू काश्मीरचे प्रभारी असणारे राम माधव या बैठकीनंतर म्हणाले," मी पक्षाच्या आमदारांच्या व ज्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांच्याशीही बोलणार आहे. चर्चेनंतर राज्यात होत असलेल्या राजकीय घटनांबाबत निर्णय घेतला जाईल."

दरम्यान, कठुआ बलात्कार प्रकरणानंतर सरकारने कोणत्या प्रकारे पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या पक्षाच्या आमदारांची भेट घेण्यासाठी श्रीनगरमध्ये आहेत. या खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅक  कोर्टात चालावा यासाठी मेहबुबा मुफ्ती जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाकडे विनंती करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा या गुन्ह्यात समावेश आहे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

(जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा)

कठुआ प्रकरणी जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला. जम्मू-काश्मीर सरकारमधील या दोन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडून सडकून टीका झाली. इतकंच नाही, तर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही दोन नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचं समर्थन करणाऱ्या रॅलीत सहभागी झाल्याचा आरोप या दोन मंत्र्यावर करण्यात आला आहे. 

जम्मू-काश्मीरमधील भाजपाचे प्रमुख सत शर्मा यांनी लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मू-काश्मीर सरकारमध्ये लाल सिंह वनमंत्री आहेत तर गंगा उद्योग आणि वाणिज्य विभागाचे मंत्री आहेत. कठुआ सामूहित बलात्कार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया न दिल्याने काँग्रेससह सर्वसामान्यांकडून मोदींवर टीका झाली. 

 

 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर