शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

येचुरींना राज्यसभेचे दरवाजे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:50 IST

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26- राज्यसभेतील फायरब्रॅंड खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताराम येचुरी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तिसरी टर्म देण्यास नकार दिला आहे. पक्षाच्या मध्यवर्ती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. येचुरी यांना पुन्हा राज्यसभेत पाठवायचे की नाही यावरुन समितीमध्ये दोन गट पडल्याने अखेर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यानंतर ...

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26- राज्यसभेतील फायरब्रॅंड खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताराम येचुरी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तिसरी टर्म देण्यास नकार दिला आहे. पक्षाच्या मध्यवर्ती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. येचुरी यांना पुन्हा राज्यसभेत पाठवायचे की नाही यावरुन समितीमध्ये दोन गट पडल्याने अखेर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यानंतर येचुरींचा राज्यसभा प्रवेश रोखला गेल्याचे स्पष्ट झाले.मार्क्सवादी पक्षाच्या नियमांनुसार कोणत्याही नेत्याला राज्यसभेच्या दोनपेक्षा अधिक टर्म देण्यात येत नाहीत. त्याचप्रमाणे पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पद भूषविणाऱ्या नेत्याला कॉंग्रेसच्या मदतीने राज्यसभेत पाठवणे पक्षाच्या केरळ गटाला मान्य नव्हते. मध्यवर्ती समितीमधील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या दक्षिणेच्या राज्यांमधील सदस्यांनीही येचुरींना तिसरी टर्म देण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.    पक्षाच्या पश्चिम बंगाल येथील सदस्यांनी येचुरींचा प्रस्ताव जून महिन्यातच पॉलिट ब्यूरोसमोर सादर केला होता. मंगळवारी मध्यवर्ती समितीसमोर चर्चेसाठी येण्यापुर्वीच तो प्रस्ताव पॉलिट ब्युरोने नाकारला होता. केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख विरोधक असणाऱ्या कॉंग्रेसच्या मदतीने येचुरी यांना राज्यसभेत पाठवणे कदापिही शक्य होणार नाही असे मत केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले होते. त्यानंतर विजयन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी केला. मात्र तो निष्फळ ठरला. या घडामोडींमुळे पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा विरुद्ध दक्षिणेतील राज्ये असे दोन गट मध्यवर्ती समितीमध्ये पडले.राज्यसभेत विरोधकांची बाजू कमकुवतराज्यसभेत सत्ताधारी रालोआला प्रत्येक मुद्द्यावर धारेवर धरण्यासाठी येचुरी प्रसिद्ध आहेत. सीताराम येचुरी, डी. राजा, नरेश अग्रवाल, आनंद शर्मा, सतीश मिश्रा, मायावती आणि शरद यादव या विविध पक्षांच्या सदस्यांनी विरोधकांची बाजू आजवर जोमाने मांडून विविध मुद्दयांवर बाजू स्पष्ट करायला लावली होती. त्यापैकी मायावती यांनी याच आठवड्यात राजीनामा दिला. आता येचुरी यांनाही राज्यसभेचे दरवाजे बंद झाल्यानंतर विरोधकांची बाजू कमकुवत होण्याची शक्यता आहे.