शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'निवडणुकीत कुणालाही पाठिंबा नाही, आंदोलनच ठरविणार निवडणुकीची दिशा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:22 IST

पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवासस्थानी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.

गजानन चोपडे -

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपण किंवा भारतीय किसान युनियनने कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन दिलेले नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. तर, समाजवादी पक्ष-रालोद आघाडीच्या एखाद्या उमेदवाराला आशीर्वाद दिला म्हणजे कोणत्या तरी पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा दिला असे होत नाही, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत टिकैत यांची भाजपविरोधी धार कमी झाल्याचे जाणवले.पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवासस्थानी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.तेरा महिन्यांचे ते आंदोलनच या निवडणुकीची दिशा ठरविणार असल्याचे सांगत सरकारविरोधी आपली भूमिका असल्याचे संकेत राकेश टिकैत यांनी दिले. या आंदोलनात राकेश टिकैत यांनी फ्रंटफूटवर किल्ला लढवला. त्यांनी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध कणखर भूमिका घेतली. त्यामुळेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यांचे समर्थन मिळविण्यासाठी समाजवादी पक्ष व जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारने एमएसपी गॅरंटी कायदा लागू केला, तर त्याचा लाभ अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रालादेखील होईल. तेथेदेखील भूसंपादन, पाणी तथा पिकांच्या दराचा प्रश्न कायम आहे. ते प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्रातील यवतमाळला येणारदेखील होतो. मात्र, कोरोना नियमावलीमुळे ते शक्य झाले नाही. तेथेदेखील कापूस, धान, संत्रा अशा पिकांना उत्पादन मूल्यावर आधारित दर मिळत नाही. तेथील हजारो लोक दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झाले. उभ्या देशातील भूमिपुत्रांसाठी लढताना कुण्या एका पक्षाला तसा पाठिंबा देणे शक्य नाही, असे ते म्हणाले.

बजेटमध्ये  कुठे आहे शेतकरी?दोन दिवसांपूर्वी सादर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये शेतकरी कुठेच दिसत नाही, ते या निवडणुकीत दिसणार असल्याचा दावा टिकैत यांनी केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कितीही आकडेवारी सादर करत असले तरी ऊस उत्पादक अद्याप लाभापासून वंचित आहेत, असे म्हणत त्यांनी योगींवर निशाणा साधला. खासदार संजय राऊत नुकतेच भेटीला आले होते. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्नांवर चर्चा केल्याचे टिकैत सांगतात. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२